पुणे: व्हॅलेंटाइन दिनाचा मुहूर्त साधत पुणे शहर व जिल्ह्यातील ३८ जोडप्यांनी बुधवारी (ता. १४) नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्हॅलेंटाइनदिनी लग्नगाठ बांधणाऱ्या जोडप्यांची संख्या सहाने कमी झाली आहे. गेल्या वर्षी ४४ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता, असे जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी संगीता जाधव-पठारे यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग संपल्यानंतर आतापर्यंत व्हॅलेंटाइन दिनी नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे मागील चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. कोरोना संसर्ग सुरू होण्याआधीच्या व्हॅलेंटाइन दिनी (२०२०) तब्बल ८२ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. ही संख्या यंदा ३८ वर आली आहे.
युवक-युवती दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस युवक-युवती प्रेमाचा दिवस म्हणून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करत असतात. त्यामुळे काही प्रेमीयुगुल हे जाणीवपूर्वक याच दिवशी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निश्चय करत असतात. नोंदणी विवाहासाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज करावे लागत असत.
परंतु बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता नोंदणी विवाहासाठी आधी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. यानुसार यंदाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील ३८ जोडप्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.