40 percent exemption on income tax canceled and recovery with retrospective  sakal
पुणे

Pune News : पूर्वलक्षी प्रभावाने मिळकतकर वसुली नको

पुणेकरांची कोणतीही चूक नसताना मिळकतकरावरील ४० टक्के सवलत रद्द करून त्याची पूर्वलक्षीप्रभावाने वसुली सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांची कोणतीही चूक नसताना मिळकतकरावरील ४० टक्के सवलत रद्द करून त्याची पूर्वलक्षीप्रभावाने वसुली सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात उद्या (ता. १७) बैठक घेत असताना त्यांनी ही सवलत पुन्हा लागू करावी व पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करू नये अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुधीर कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

पुणे महापालिकेने १९७० मध्ये मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला, वर्षानुवर्षे त्याची अंमलबजावणी सुरू होती, पण या निर्णयास राज्य शासनाची अंतिम मंजुरी घेण्याचे राहून केले. १९७० चा ठराव अचानक ऑक्टोबर २०१८ मध्ये विखंडित केला, त्यामुळे आता ४० टक्के मिळकतकराची वसुली २०१९ पासून सुरू झाली आहे.

९७ हजार नागरिकांना हजारो रुपयांचा कर आला आहे. तर आणखी ५ ते ६ लाख नागरिकांवर त्याची टांगती तलवार आहे. यामध्ये सामान्य नागरिकाची काहीही चूक नाही महापालिका आयुक्तांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणे त्यांची वार्षिक कर भरत होते. या प्रकरणामध्ये चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने माफी दिली आहे, मग  पुणेकरांना माफी का दिली जाऊ शकत नाही. याचा विचार करून पूर्वलक्षी प्रभावाने कुठल्याही रकमेची वसुली होऊ नये, अशी मागणी केसकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT