पुणे

पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात

ज्ञानेश सावंत

पुणे : पुणेकरांनो, आपण सारे कोरोनाला खूपच घाबरतोय. साधा ताप, थंडी, सर्दी जाणवली, तरी काळजात धस्स होतंय; पण आपण या आजाराला सहज हरवू शकतो, हे शहरातील सुमारे चारशे लहानग्यांनी दाखवून दिलेय. कोरोनामुक्त झालेली ही बच्चे कंपनी सध्या मस्तपैकी खेळत-बागडत आहे. 

आनंदाची बाब म्हणजे 14 दिवसांच्या "होम क्वारंटाइन'नंतर यातील एकाही मुलाला कुठलाच त्रास नसल्याचे तपासणीतून दिसून आले आहे. पुण्यात गेल्या अडीच-पावणेतीन महिन्यांत 1 ते 10 वर्षे वयोगटातील 577 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील 67 टक्के मुले पूर्णपणे बरी झाली आहेत. उर्वरित मुलांवर उपचार सुरू आहेत, ती सगळी उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून, त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरात आजतागायत सुमारे नऊ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील सर्वाधिक प्रमाण हे 40 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे आहे. दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही या आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यातून मुले बरे होतील का, अशी शंका होती; परंतु ती खोटी ठरवत बहुतांशी मुला-मुलींनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चौदा दिवसांत ठणठणीत 

कोरोनाग्रस्त मुलांवर बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार केले जात आहेत. अन्य रुग्णांप्रमाणेच त्यांना उपचार दिले जातात. या मुलांमध्ये इतरही काही आजार असल्याचे दिसून आले असून, त्या आजारासह त्यांच्यावर कोरोनाचेही उपचार केले जात आहेत. बहुतांशी मुले उपचारादरम्यान 14 दिवसांत ठणठणीत झाली आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. 

कोरोनाबधित मुले / वय मुलांची संख्या 
1 24 
2 75 
3 38 
4 43 
5 48 
6 53 
7 76 
8 78 
9 60 
10 82 
------------------------ 
एकूण बाधित 
577 
मुले 
309 
मुली 
268 
----------- 
कोरोनामुक्त 
एकूण 388 

------ 
मुले 
205 
मुली 
183 
---------- 
उपचार सुरू असलेले 
एकूण 187 
मुले 
102 
मुली 
85 
-------- 
घरातील मोठ्या व्यक्‍तींकडूनच लहान मुलांना संसर्ग झाला आहे. मात्र उपचारानंतर मुले बरी झाली आहेत. त्यांच्यावर वेळेत आणि चांगले उपचार केले जात असल्याने मुले कोरोनामुक्त होत आहेत. मुले बाधित होणार नाहीत, यासाठी काळजी घ्यायला हवी. 

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 

कोरोना झालेल्या लहान मुलांना बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार होत आहेत. काही रुग्णांना गरजेनुसार बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. कोरोनामुक्त झालेल्या आणि घरी गेलेल्या सर्व मुलांची तब्येत ठीक आहे का, याचीही विचारपूस केली जात आहे. 

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT