400 crore Fund sanctioned Jal Jeevan Mission Dattatray Vithoba Bharne indapur  sakal
पुणे

जल जीवन मिशन अंतर्गत ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर - दत्तात्रय भरणे

सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी योजना राबविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : पाणी हे जीवन असून महिलांच्या डोक्या वरचा हंडा उतरविण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील १४६ महसूली गावांना २४६ कोटी रूपयांचा निधी मंजूर होता. मात्र ७३ गावात जागेची व पाणी स्त्रोताची अडचणनिर्माण झाल्याने हे काम पुढे सरकले नाही. मात्र आता प्रचलित दरा नुसार याचे मूल्य चारशे कोटी रूपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सरपंच, उप सरपंच,सदस्य,ग्रामसेवक व गाव पदाधिकाऱ्यांनी ही योजना सक्षमपणे राबविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे,त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबध्द आहे असे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्या तील १४६ महसूली गावांना हर घर जल योजने अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या योजने संदर्भात ७३ गावांमध्ये जागेची व पाण्याची अडचण दूर करण्यासाठी येथील पुणे जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँकेच्या इंदापूर विभागीय कार्यालय सभागृहात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकासअधिकारी विजयकुमार परीट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंता महेश रसाळ, उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग इंदापूर शाखा अभियंता दाऊद शेख,ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता अमित आडे,पुणे पाटबंधारे अभियंता दोडपकर ,प्रताप पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचेसदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,वरकुटेचे सरपंच बापूराव शेंडे, लोणी देवकर चे सरपंच कालिदास देवकर,सचिन खामगळ यांच्या सह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, जल जीवन मिशन योजनेकरिता जिल्हा परिषद मधून १७० कोटी निधी मंजूर असून २५ गावांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मिळून ७३ गावांची जागेची व पाण्याची अडचण आहे.ज्या गावातील जागेची अडचण आहे त्या गावातील ग्रामसेवकांनी दोन गुंठे जागेच्या मागणीचा प्रस्ताव सबंधित विभागासाठी तातडीने सादर करावेत.त्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या गावात पाण्याची किंवा जागेची समस्या आहे, त्या गावा तील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवावेत असे आवाहन त्यांनी केले.

गावच्या पाण्याच्या बैठकीस अनेक ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने मंत्री भरणे यांनी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांना फैलावर घेतले. याची दखल घेवून श्री. परीट यांनी ग्रामसेवकांना नोटिसा काढून त्यांचा आज एक दिवस विना वेतन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT