ST Bus Accident at Mahude Budruk esakal
पुणे

Bus Accident : महुडे मार्गावरील अंबाबाईच्या उतारावर एसटी बसचा अपघात; 42 प्रवासी जखमी

ST Bus Accident at Mahude Budruk : सकाळची भोरहून दहा वाजता सुटलेली भोर-महुडे एसटी बस महुडेहून भोरकडे परतत असताना हा अपघात झाला.

सकाळ डिजिटल टीम

बसमध्ये काही तरी बिघाड झाल्यामुळेच अपघात झाल्याचे बोलले जत आहे. भोर आगार व पोलिसांकडून अद्याप अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.

महुडे : महुडे (ता. भोर) हद्दीत आज महुडेहून भोरकडे जात असणाऱ्या एसटी बसचा (एमएच ०६ एस ८२८९) महुडे बुद्रुक येथील अंबाबाईच्या उतारावर साईडपट्टी सोडून बाजूच्या जागेत रुतल्याने अपघात (Bus Accident) झाला. बस चिखलात रुतल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी बस साईडपट्टीवरुन खाली उतरल्यावर बाजूच्या खड्ड्यात जोरदार आपटल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघाताचे कारण समजले नाही. जखमीतील ३९ रुग्णांवर भोर उपजिल्हा रुग्णालयात (Bhor Hospital) तर, तीन रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ४२ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सविता रघुनाथ पिलाणे, शिवराम देवबा पिलाणे, शिवन्या दामगुडे, द्रोपती किसन करंजकर, अंकुश पिलाणे, पूजा नवनाथ बांदल, रंजना विठ्ठल पिलाणे, मुक्ताबाई दामगुडे, पुष्पा दत्ताञय दामगुडे, अंकिता पिलाणे, छंबुबाई दामगुडे, सागर दामगुडे, हरिभाऊ दामगुडे, सुप्रिया शिंदे, बाजीराव शिंदे, निखिल पिलाणे, संगिता भगवान गोडांवळे, अंकुश दामगुडे, रमेश सिधू दामगुडे, भिकू खोपडे, द्रोपदा दामगुडे,

तसेच यशदाबाई पिलाणे, गोपाळ गोविंद दामगुडे, सोपान दामगुडे, नामदेव दामगुडे, पार्वती भालघरे, अनिता दामगुडे, यशवंत सोनबा दामगुडे, रंजना कोडींबा मोरे, प्रतीक्षा अनिल दामगुडे, आनुबाई हरिभाऊ दामगुडे, तुलशाबाई रामचंद्र पिलाणे, भागुबाई कृष्णा पवार, कमल गोपाल दामगुडे, वेदांत संजय शिंदे, सिंधुबाई चंद्रकांत दामगुडे, सरिता आनंदा दामगुडे, अनुबाई हरिभाऊ दामगुडे, भागुबाई कृष्णा पिलाणे, मोनिका पांडुरंग दामगुडे हे प्रवासी जखमी झाले आहेत. या एसटीला वाहक अजित प्रकाश आवाडे तर, चालक सोपान काशिनाथ तायडे होते.

सकाळची भोरहून दहा वाजता सुटलेली भोर-महुडे एसटी बस महुडेहून भोरकडे परतत असताना हा अपघात झाला. सोमवार असल्याने बस पूर्ण भरलेली होती. बसमधून ४२ हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. ४२ प्रवासी जखमी झाले असून तातडीने उपचारासाठी त्यांना भोरला पाठवण्यात आले. ३९ जणांवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्या ३९ जणांपैकी १४ जणांना ॲडमिट करुन घेतले असून इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे यांनी सांगितले.

तर, तीन जण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली आहे. भोर डेपोच्या बस खराब झाल्या असून जागोजागी बंद पडत असतात. बसमध्ये काही तरी बिघाड झाल्यामुळेच अपघात झाल्याचे बोलले जत आहे. भोर आगार व पोलिसांकडून अद्याप अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT