Rain sakal
पुणे

Pune Rain : टेमघर येथे ४४ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - अवकाळी पावसाचा आज तिसऱ्या दिवशी टेमघर धरण परिसरात ४४ तर पानशेत धरणातील भालवडी येथे ३३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद रात्री नऊ वाजेपर्यंत झाली आहे.

खडकवासला सिंहगड रस्ता परिसरात तर संध्याकाळी उशिरा पावसाच्या हलक्या सरी पडल्या. खडकवासला येथे एक मिलीमीटर पाऊस पडला. सिंहगड रस्ता परिसरात किरकोळ पाऊस पडला. येरवडा 35, कात्रज ३ मिलीमीटर पाउस झाला आहे.

शहरालगत असलेल्या तसेच मुळशी, मावळ वेल्हे, भोर, खेड तालुक्यात रात्री नऊ वाजेपर्यंत चांगला पाऊस पडला आहे.

  • मुळशी तालुका- ताम्हिणी दावडी ४०, कासारसाई 24, ताथवडे सहा, कुंभेरी ५,

  • मावळ तालुका- पवना सात, वाडेश्वर 11, कोळीये २४, बुधावाडी ११, निगडे ६,

  • वेल्हे तातालुका- वेल्हे 37, भट्टी वाघदरा 18, शिरकोली, 21,‌ वरसगाव २,

  • भोर तालुका- भाटघर येथे 27, आंबेघर 37, नीरा देवघर धरण 18, शिरोली १०, शिरगाव 9,

  • पुरंदर तालुका- सासवड 19, खेंगरेवाडी ७,

  • खेड तालुका-आळंदी 24, औंढे 18, आसखेड 17, खरोशी 12, वाकी 25, भीमाशंकर 19, चासकमान १४, भामा आसखेड (विरम) ४४

  • जुन्नर तालुका- ओझर 10 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT