पुणे - गेल्या पन्नास दिवसांत पुणे शहरातील (Pune City) एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या ५२ हजार ८४७ ने कमी (Less) झाली आहे. सध्या शहरात फक्त ३ हजार ६९९ सक्रिय रुग्ण शिल्लक राहिले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ १ हजार ९६९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ७३० जण गृहविलगीकरणात आहेत. (53000 Corona Patients Less in 50 Days in Pune City)
पुणे शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची सर्वोच्च संख्या १८ एप्रिल २०२१ ला ५६ हजार ५४६ नोंदली गेली होती. तेव्हापासून ती सातत्याने कमी होत गेली आहे. तेव्हापासून आजतागायतच्या (ता.८) पन्नास दिवसांत ही संख्या कमी झाली आहे. दरम्यान, २८ एप्रिल २०२१ ला रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या १० हजार ३९८ होती. ही संख्या मागील चाळीस दिवसांपासून सातत्याने कमी होत गेली आहे. गेल्या चाळीस दिवसात ८ हजार २२९ खाटा रिकाम्या झाल्या आहेत.
चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. या लाटेत एका दिवसांतील सर्वाधिक ७ हजार १० नवे कोरोना रुग्ण हे ८ एप्रिल २०२१ ला नोंदले गेले होते. त्यानंतर एका दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या ही ११ एप्रिलपासून सातत्याने कमी होत होती. दररोज संख्या कमी होण्याचा ट्रेंड आजही कायम आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोज शहर व जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त रुग्ण, एकूण सक्रिय रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या दररोजच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.