खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर सुरु झाला.
खडकवासला - अंबी नदीवरील पानशेत धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन जुलै रोजी या धरणात १.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ९.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पानशेत धरणाची साठवण क्षमता १०.६५ टीएमसी असून, आजअखेर पानशेत धरणात ८.०७ टीएमसी म्हणजे ७५.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर सुरु झाला. तो रविवारी दिवसभर कायम होता. तर, सोमवारी थोडा कमी झाला. गेल्या एक जूनपासून आजअखेर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार ४५० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
शनिवार सकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे आठ, पानशेत ३७, वरसगाव ४० आणि टेमघर येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, सगळ्यात अगोदर खडकवासला धरण १०० टक्के भरले होते. पाऊस कमी झाल्याने येवा कमी झाला आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सिंचनासाठी व शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला कालव्यातून एक हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणातील पाणीसाठा ९२.०६ टक्के झाला आहे. परंतु पानशेत, वरसगाव व टेमघर धरणातील पाणीसाठा वाढत असल्याचे चित्र आहे.
धरणांतील साठा (२४ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
धरणाचे नाव / एकूण क्षमता (टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)/ टक्केवारी
खडकवासला- १.९७ /१.८०/ ९१.०६
पानशेत- १०.६५/८.०७/७५.७६
वरसगाव- १२.८२/८.९६/६९.९३
टेमघर- ३.७१/२.२०/५९.२८
चार धरणांतील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी
आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २१.०३ टीएमसी (७२.१४ टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.