Home Sakal
पुणे

८९ टक्के पुणेकर भाड्याच्या घरात; मालकीच्या घरात जाण्याची भावना

८९ टक्के भाडेकरू पुणेकरांची भावना, गोदरेज हाउसिंग फायनान्सने केलेल्या पोस्ट जनरेशन रेंट अभ्यासातील निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे स्वतःचे भविष्य अधिक सुरक्षीत करण्यासाठी पुण्यातील ८९ टक्के नागरिक भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्याचा विचार करीत आहेत. गोदरेज हाउसिंग फायनान्सने (जीएचएफ) केलेल्या पोस्ट ‘जनरेशन रेंट’ अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे.

कोविड - १९ नंतरच्या जगात स्वतःचे भविष्य सुरक्षीत करण्यासाठी देशातील नागरिकांकडून मालमत्ता खरेदी, मालमत्ता निर्मिती आणि गुंतवणुकीचे पर्याय ठरविण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात आणि ग्राहकांच्या वर्तणुकीत झालेले बदल यावर प्रकाश टाकण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. त्यातून असे स्पष्ट झाले की, ५४ टक्के पुणेकरांनी गेल्या एक वर्षात नवीन घराचा आणि गृह कर्ज पुरवठादाराचा शोध घ्यायला सुरवात केली आहे.

सध्याच्या घडीला नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे शहरातील ३० टक्के नागरिकांचे मत आहे. आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे ही नेहमीच प्राधान्याची गोष्ट राहिल्यामुळे २३ टक्के लोकांना नवीन घर खरेदी करायला आवडेल, असे प्रतिसादकांना वाटते.

विविध मुद्यांवर नागरिकांच्या मतांची टक्केवारी :

- एका वर्षांत स्वतःसाठीच्या घराचा आणि त्यासाठी गृहकर्ज वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा शोध घेण्यास सुरवात केली - ४९.१३

- नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असेल - ३२.९

- मालकीचे घर असणे ही सर्वाधिक प्राधान्याची गोष्ट असल्याचे मत - १६

- स्वतःच्या मालकीचे घर असणे ही गोष्ट दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटते - २५.५

- नोकरीची हमी प्रथम क्रमांकावर - ४०.६

वित्तीय कंपनी निवडताना महत्त्वाचे मुद्दे :

- योजनेची लवचिकता

- ब्रँडची विश्वासार्हता

- पारदर्शकता

- डिजिटल सोयीसवलती

- अंमलबजावणी व्हायला लागणारा वेळ

आधीच्या समजुतींना फाटा :

‘जनरेशन रेंट’ ही जगभरातील मिलेनियल्सशी संबंधित सु-व्यवस्थित घटना आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि घरे विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेणे पसंत करणाऱ्यांचा हा गट आहे. मात्र आधीच्या समजुतींना फाटा देत या अभ्यासाने ही बाब उघड केली आहे की साधारण ७६ टक्के भारतीय आता गुंतवणूक आणि जीवनशैलीसाठीचा पर्याय म्हणून भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्याचा विचार करत आहेत.

कोरोनामुळे देशातील ग्राहकांच्या पसंतीक्रमात बदल झाला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून भविष्य सुरक्षीत करण्याकडे त्यांचा कल आहे. परवडणे हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला असताना घर खरेदी करणे यासाठी कदाचित कधीच अधिक चांगली वेळ नसते. मालमत्ता म्हणून आणि आर्थिक सुरक्षिततेचा मुख्य आधारस्तंभ म्हणून हा नेहमीच महत्त्वाचा घटक राहिला आहे. या दीर्घकाळाच्या जबाबदारीसाठी ग्राहकांना योग्य आर्थिक सल्ला आणि मार्गदर्शन हवे असते.

- मनीष शहा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, गोदरेज हाउसिंग फायनान्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT