Pune accident 
पुणे

Pune: पाण्याचा अंदाज आला नाही... खडकवासला धरणाजवळील डबक्यात पडून 17 वर्षाच्या मयुरचा मृत्यू

boy died after falling into a puddle: मयूर नायडू असे १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज सकाळी १ ते २ वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

कार्तिक पुजारी

Pune Crime: पुण्यात पाणाच्या डबक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयूर नायडू असे १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज सकाळी १ ते २ वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्यात अनेक जणं कपडे धुण्यासाठी जात आहेत. आज दुपारी नायडू हा त्या ठिकाणी गेला होता. तिथेच जवळ असलेल्या डबक्यात तो उतरला मात्र अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बचाव कार्यासाठी अनेक पथकं त्याठिकाणी दाखल झाली होती. मात्र काही वेळाने त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. उत्तमनगर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनेकजण कपडे धुण्यासाठी धरणाजवळ असलेल्या पाण्याचा वापर करतात. यावेळी अनेक महिला आपल्यासोबत मुलांना देखील घेऊन जात असतात. मयूर हा कोणासोबत तिथे गेला होता हे समजू शकलेलं नाही. पण, तो डबक्यात पोहोण्यासाठी उतरला होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो बुडाला आहे. त्यामुळे त्याचे आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT