Orchid International School sakal
पुणे

Orchid International School : ऑर्किड स्कूलच्या अध्यक्षासह संचालकाविरुध्द गुन्हा दाखल;पहिली ते दहावीपर्यंत अनधिकृत वर्ग सुरू करून फसवणूक

उंड्री येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शासन मान्यतेशिवाय अनधिकृत वर्ग सुरू करून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उंड्री येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शासन मान्यतेशिवाय अनधिकृत वर्ग सुरू करून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऑर्किड स्कूलचे अध्यक्ष, संचालकासह मुख्याध्यापिकेविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकारी ज्ञानदेव आबाजी खोसे (वय ५५, रा वाघोली) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष जे. डिकोस्टा (रा. बंगळूर), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर) आणि मुख्याध्यापिका अनिता नायर या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंड्री येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल अनधिकृत असून, या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग चालविण्यात येत होते. शासन मान्यता नसतानाही शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे मूळ जन्म प्रमाणपत्र अनधिकृतपणे ताब्यात घेणे, इतर शाळांना दाखल्यांची मागणी केली जात होती. पालकांकडून शुल्क घेऊन आणि शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचे खोसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT