Bogus Doctor esakal
पुणे

Bogus Doctor : कदमवाकवस्ती येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन : वैद्यकीय‌ डिग्री नसतानाही दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका बोगस डॉक्टरवर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश रंगनाथ तोरणे (वय ६३, सध्या रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर) असे गुन्हा दाखल केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली रघुनाथराव भंगाळे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करीत होत्या. तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांचा त्यांना फोन आला की, कदमवाकवस्ती येथील पांडवदंड रस्त्यावर असलेल्या जनसेवा क्लिनिकमध्ये प्रकाश तोरणे हा व्यक्ती वैद्यकीय शिक्षणाचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करत आहे.

डॉ. गोरे यांच्या‌ सूचनेनुसार विस्तार अधिकारी डॉ. महेश वाघमारे, डॉ. रुपाली भंगाळे व समुदय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज उबरे हे लोणी काळभोर पोलिसांना घेऊन जनसेवा क्लिनिकमध्ये गेले. त्यांनी प्रकाश तोरणे याच्याकडे डॉक्टर असल्याबाबत व औषध-गोळया विक्रीबाबत महाराष्ट्र कौंसिल ऑफ मेडीसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. तेव्हा तोरणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचे कोणतीही शैक्षणिक पात्रता अथवा पदवी नसल्याचे समोर आले. तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याचे तोरणे याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध गोळ्या जप्त करून दवाखाना सील केला आहे.

दरम्यान, मागील पाच वर्षांपासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT