Pune University sakal
पुणे

Pune University : अमली पदार्थप्रकरणी चार सदस्यीय समिती;पुणे विद्यापीठातील प्रकाराबद्दल चंद्रकांत पाटील यांची माहिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात अमली पदार्थ सापडल्याच्या घटनेची गांभीर्याने नोंद घेण्यात आली असून या घटनेबाबतचा एफआयआर संबंधित पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात अमली पदार्थ सापडल्याच्या घटनेची गांभीर्याने नोंद घेण्यात आली असून या घटनेबाबतचा एफआयआर संबंधित पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे. तसेच या घटनेचा योग्य तो तपास करण्यासाठी कुलगुरुंनी तज्ञांची चार सदस्यीय समिती स्थापन केली असून तिचे कामकाज सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

या घटनेबाबत विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी विद्यापीठात गांजा सापडणे हे अतिशय निंदाजनक असून अशाप्रकारे जर घटना विद्यापीठांमध्ये घडत असतील तर प्रशासन काय करत आहे. त्याचबरोबर शासन म्हणून आपण काय भूमिका घेणार आहात, अशी लक्षवेधी मांडून अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर याच विषयावर विधान परिषद सदस्या शशिकांत शिंदे यांनीही राज्य शासनावर टीका करताना महाराष्ट्राची स्थिती ‘उडता पंजाब’प्रमाणे होत चालली आहे. हे राज्याला शोभणारे नाही. यावर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला.

या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, या घटनेवेळी जप्त केलेले साहित्य पोलिसांनी पंचनामा करुन ताब्यात घेतले असून त्यानुसार पोलिस यंत्रणेमार्फत याबाबतची पुढील कार्यवाही सुरू आहे. प्रवेश नियमावली कटाक्षाने पाळण्यासाठीची सुव्यवस्थित कार्यप्रणाली (एसओपी) कार्यान्वित केली आहे. वसतिगृहाची सुरक्षा वाढवण्याबाबत सुरक्षा विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT