पुणे : महापालिकेतील कामाचे कंत्राट मिळविण्याच्या वादातून एका ठेकेदारावर पिस्तूल रोखून धमकी दिल्याची घटना गंज पेठेत घडली. या प्रकरणी मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ठेकेदार निर्मल मोतीलाल हरिहर (वय ३६, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय ३७) आणि महेश राजेंद्र गिते (वय ३५, दोघे रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार निर्मल हरिहर रविवारी दुपारी गंज पेठेतील घराजवळ थांबले होते. गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश त्याठिकाणी आले.
हरिहर यांना ११ कोटींच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. ते कंत्राट घेऊ नये, यासाठी पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली, असे हरिहर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.