Madanwadi crime sakal
पुणे

Madanwad Crime : मदनवाडी येथे डोक्यात दगड खालून एकाचा खुनः खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ

प्रशांत चावरे

मदनवाडी(ता.इंदापुर) येथे दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणांवरुन झालेल्या शिवीगाळ व भांडणातुन त्यापैकी एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान खुनाबाबतची माहिती परिसरात समजताच एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात़डीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीस अटक केली आहे.

विजयकुमार विठ्ठलराव काजळे(वय.४५, रा. निरगुडे,ता.इंदापुर) असे खुन झालेल्या युवकांचे नाव आहे. या प्रकरणी राज भगवान शिंदे(वय. २० रा. मदनवाडी,ता.इंदापुर) यांचेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशीः मदनवाडी(ता.इंदापुर) येथील गायरान परिसरांमध्ये विजयुकमार काजळे व राज शिंदे हे सोमवारी(ता.१४) रात्री उशिरा एकत्र बसले होते.

त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला वादाचे प्रत्यंयतर शिवीगाळीमध्ये झाले. त्यानंतर राज शिंदे यांने रागाच्या भरात विजयकुमार काजळे याचे डोक्यात दगड घालुन त्याचा खुन केला असल्याची माहिती भिगवण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान मंगळवारी(ता.१५) सकाळी खुनाबाबत माहिती परिसरांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी राज शिंदे यास अटक केली आहे.

या प्रकरणी आरोपी राज भगवान शिंदे(रा. मदनवाडी,ता.इंदापुर) यांचेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली आहे. अधिक घटनेचा अधिक तपास भिगवण पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT