Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : बाराशे कोटींचे मेफेड्रोन जप्त ; पुण्यातील विश्रांतवाडी, दौंडमधील कुरकुंभ येथे कारवाई

विश्रांतवाडीतील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत सुमारे ६०० किलो मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कुरकुंभ : विश्रांतवाडीतील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत सुमारे ६०० किलो मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची बाजारपेठेतील किंमत सुमारे बाराशे कोटी रुपये आहे.

पुण्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त केले आहे. मेफेड्रोनच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात सोमवारी (ता. २०) रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती, तर कुरकुंभ येथील अर्थकेम लॅब्रोटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मंगळवारी (ता. २०) पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकण्यात आला. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुंड वैभव ऊर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना सोमवारी (ता. १९) गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले.

शेख याने विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात मेफेड्रोन लपविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. विश्रांतवाडीतील गोदामातून ५२ किलो ५२० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. त्याची किंमत १०५ कोटी चार लाख रुपये आहे, तर अमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर याचे धागेदोरे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचले.

पुणे अन्वेषण पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅब्रोटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मंगळवारी (ता. २०) पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकला. ही कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत चालू होती. छाप्यात सहभागी असलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंपनीतील अंदाजे ५५० किलो मेफेड्रोनचा साठा सापडला. एकूण सुमारे ६०० किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत बाराशे कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. छापा टाकण्यासाठी आठ ते नऊ वाहनांमधून पोलिस पथक आले होते.

यासंदर्भात स्थानिक पोलिसांना थोडीही कल्पना नव्हती. हे सकाळी त्यांच्या उशिरा येण्यावरून निदर्शनास आले. घटनास्थळावरून गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा व कंपनीच्या संबंधित अनिल साबळे व आणखी एकाला चौकशीसाठी घेऊन गेले. तसेच, काही महत्त्वाची कागदपत्रे व संगणक जप्त केले आहेत. हा सर्व मुद्देमाल एका मालवाहू जीपमधून घेऊन गेले. कारवाई प्रक्रिया पूर्ण होऊनही अजून कारवाई चालू असल्याचे कारण सांगून पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले.

पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना मंगळवारी (ता. २०) न्यायालयात हजर केले होते. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे? यात परदेशी व्यक्तीचा हात आहे का? आरोपींचा या गुन्‍ह्यात कशा प्रकारे समावेश आहे? यासह गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याच्या सखोल चौकशीसाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT