a young woman was abuse by senior assistant loco pilot of the railway pune crime sakal
पुणे

Pune Crime : रेल्वेच्या वरिष्ठ सहायक लोको पायलट कडून तरूणीवर बलात्कार

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी रेल्वेच्या एका वरिष्ठ सहायक लोको पायलट विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरूणीला कोंडून मारहाण केली जात होती.

पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी या बाबत माहिती दिली. विकास कोमलकुमार पंथी ( वय ३७ , रा. ओम शांती अपार्टमेंट, गजानन सोसायटी, दौंड ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

दौंड रेल्वे स्थानकात वरिष्ठ सहायक लोको पायलट पदावर काम करणार्या विकास पंथी याचे कंत्राटी पध्दतीवर काम करणार्या एका तरूणीशी परिचय झाला होता. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विकास याने सदर तरूणीला चौफुला ( ता. दौंड) ओयो लॅाज व दौंड - पाटस रस्त्यावरील मनिषा लॅाज येथे वेळोवेळी नेत शारीरिक संबंध ठेवून त्याचे चित्रीकरण केले होते.

विकास याचे लग्न झाल्याची माहिती मिळताच तरूणीने त्याला जाब विचारला असता विकास याने तरूणीला दमदाटी केली. त्यानंतर तिला सदनिकेत बोलावून तेथे कोंडून मारहाण केली. दरम्यान पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगत त्याने पुन्हा संपर्क साधत तरूणीला सदनिकेत बोलावून पत्नीच्या समोर तरूणीच्या मोबाइल संचातील छायाचित्रे व झालेला संवाद नष्ट केला.

दौंड येथून सोलापूर येथे बदली झाल्यावर लग्न करण्याचे आमिष दाखवून विकासकुमार याने तरूणीला पुणे येथील एका मुलींच्या वसतीगृहात दाखल केले. परंतू त्यानंतर लग्नास नकार देत संपर्क तोडल्याने तरूणीने दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी तरूणीच्या फिर्यादीनुसार विकासकुमार पंथी याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४ ( बलात्कार ), कलम ६९ ( लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक समागम करणे ),

कलम १२७ (२) ( चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे ) व कलम ११५ (२) (इच्छापूर्वक दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा यवत (ता. दौंड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने पुढील तपासाकरिता यवत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"45 दिवस झोप नाही, जेवणही नाही...", लोन विभागातील कर्मचाऱ्यानं कामाच्या दबावामुळे संपवलं जीवन, आई-वडिलांना शेवटचं पत्र

Maintenance Case : एक महिला, दोन वकील अन् निष्पापांची शिकार; पोटगीच्या नावावर पुरुषांना फसवणाऱ्या महिलेला हायकोर्टाचा दणका

Bigg Boss Marathi: "अरबाजच्या भिकेमुळे..."; निक्कीचं कौतुक अन् टीकाही, दुसरा फायलनलीस्ट कोण ठरणार... सर्वाधिक मतं कुणाला?

Mahavikas Agadi: महाविकास आघाडीत बिघाडी? मुंबईतल्या 6 जागांवर एकमत होईना..!

Mumbai Road Accident : गोरेगावातील ओबेरॉय मॉलसमोर भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं! 13 वर्षीय मुलीचा जागेवर मृत्यू

SCROLL FOR NEXT