Pune Lok Sabha Poll Sakal
पुणे

Pune Lok Sabha Poll : पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीवर आबा बागूलांची पक्षनेतृत्वावर टीका

काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागूल यांनी उघड नाराजी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागूल यांनी उघड नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या पक्षातून आलेल्याला दीड वर्षात लोकसभेची उमेदवारी मिळत असेल आणि ४० वर्ष पक्षात नेष्ठेने काम करणाऱ्यांना डावललेले जात असेल तर राहुल गांधी यांनी काढलेल्या न्याय यात्रेला काय अर्थ आहे ?

काँग्रेसच्या धोरणांची राज्यात पायमल्ली होत आहे अशी टाका बागूल यांनी पक्षातील नेत्यांवर केली आहे. माजी उपमहापौर आबा बागूल हे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण पक्षाने धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. बागूल म्हणाले, ‘‘गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मी प्रबळ इच्छुक होतो. पक्षाने माझी उमेदवारी का नाकारली याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येऊन जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करून निष्ठेची हत्या करण्यासारखेच आहे.

काँग्रेसमध्ये माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्ते असताना त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच खेदजनक आहे. काँग्रेसचे उमेदवारी देण्याचे धोरण आहे, त्यात एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली. पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे, अशी टीका बागूल यांनी केली.

निष्ठावंतांची घेणार बैठक

पक्षाच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्याला लोकसभेची उमेदवारी देऊन निष्ठावंतांना धक्का दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे बागूल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT