Wagholi Accident sakal
पुणे

Wagholi Accident : दुचाकीला धडक दिल्यानंतर फरार झालेला डंपर व चालक २४ तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात

Wagholi Accident : वाघोलीत दुचाकीला धडक देऊन फरार झालेला डंपर व चालक २४ तासांच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : रविवारी वाघोलीत डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डंपर चालक डंपर सह फरार झाला होता. लोणीकंद पोलिसांनी २४ तासाच्या आत डंपरची माहिती काढून चालकाला ताब्यात घेतले.

अनिल अशोक मुदळकर ( वय 32 वर्ष रा. ५ नंबर भावडी रोड , वाघोली ) असे अटक केलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. तर विकास पोपट कोळेकर ( वय 35 वर्ष रा. मांजरी रोड, हडपसर ) यांच्या मालकीचा हा डंपर आहे. या प्रकरणी विश्वनाथ हेब्बटम् ( वय ३२ वर्षे, न्याती एलान सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली ) यांनी फिर्याद दिली. रविवारी सकाळी पावणे

दहाच्या सुमारास वाघोलीत चितळे स्वीट होम समोर पुणे नगर महामार्गावर डंपरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत सिरी चंदना चिंता या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती विश्वनाथ जखमी झाले. यानंतर डंपर चालक डंपर सह फरार झाला. अपघाताची घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नाही.

मात्र अपघातापूर्वीचे दुचाकी व डंपर चे सी सी टीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात डंपर चा नंबर दिसत नव्हता. पोलिसांनी अखेर परिसरातील अनेक सी सी टीव्ही फूटेज शोधून डंपर व चालकाचा शोध लावला. व चालकाला अटक केली. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस पक्षकाने हा शोध घेतला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT