शिरूर : भरधाव जाणाऱ्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या मोटारीला ठोकरले. ही ठोकर एवढी जोराची होती की मोटार रस्तादूभाजकावरून पलिकडच्या बाजूला गेली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकची पुढील बाजूस धडक बसली. या धडकेत मोटारीचा चक्काचूर होऊन मोटारीतील एक महिला जागीच ठार झाली तर चालक गंभीर जखमी झाला. पुणे - नगर रस्त्यावर रांजणगाव एमआयडीसीजवळ काल (ता. २५) सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. लिलाबाई बबन काळे (वय ६७) या मोटारीतील महिला या अपघातात मृत्युमूखी पडल्या तर मोटार चालविणारा त्यांचा मुलगा दिलीप बबन काळे (वय ४२, दोघे रा. मोशी प्राधिकरण, पुणे) हे गंभीर जखमी झाले. या अपघातप्रकरणी मारूती माधव कलाल (रा. जांब, ता. मुखेड, जि. नांदेड) या कंटेनर चालकाविरूद्ध व विनोद भाटू राठोड (रा. रूई, ता. जि. यवतमाळ) या ट्रकचालकाविरूद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : दिलीप काळे हे आईसमवेत आपल्या होंडासिटी मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम ५९८३) नगर जिल्ह्यातील देहरे या मूळगावी कामानिमीत्त चालले होते. रांजणगाव एमआयडीसीतील व्हर्लपूल कंपनीजवळ आले असताना मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (क्र. एनएल ०१ एई ७१६) त्यांच्या मोटारीला ठोकरले. ही धडक इतकी जोरदार होती की मोटार दूभाजकावरून उडून विरूद्ध बाजूला आली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱया ट्रकची (क्र. एमएच १२ एमव्ही ६१६१) मोटारीला समोरून धडक बसली. अपघातानंतर काळे मायलेक मोटारीतच अडकून पडले होते. रांजणगाव एमआयडीसी चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, दत्तात्रेय शिंदे, व्ही. एस आंबेकर, विनायक मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने मोटार बाजूला घेत जखमींना बाहेर काढले. मात्र लिलाबाई काळे यांचा तत्पूर्वीच मृत्यु झाला. दिलिप काळे यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.