Compensation decision sakal
पुणे

Accident Compensation : अपघाती मृत्यू झालेल्या नोकरदाराच्या कुटुंबीयांना एक कोटी १५ लाखांची नुकसान भरपाई

मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर झाला होता अपघात

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ट्रकच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिला. न्याय प्राधिकरणाचे सदस्य असलेले जिल्हा न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला.

मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर ७ मे २०१९ ला हा अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेला तरुण खासगी रुग्णालयात तंत्रज्ञ होता. त्याला दरमहा ३७ हजार वेतन मिळत होते, तसेच तो एका खासगी रुग्णालयातील क्ष किरण विभागात अर्धवेळ काम करत होता. तेथे त्याला दरमहा १२ हजार पगार मिळत होते. ३५ वर्षीय तरुणाच्या वेतनावर त्याचे कुटुंब अवलंबून होते.

तरुणाची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनी ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी यांच्यामार्फत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दावा केला होता. डंपर मालक आणि त्याची विमा कंपनी एस. बी. आय. जनरल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता. दाव्यात दाखल झालेली कागदपत्रे, तसेच साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने ८७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

दावा दाखल झाल्यापासून दरमहा आठ टक्के व्याजदराने एकूण मिळून एक कोटी १५ लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. विमा कंपनीच्यावतीने ॲड. बाठिया यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT