सेवाडी : पुणे - सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळी पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.
मात्र अपघातानंतर सुमारे तीन तासानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघात स्थळी आली नाही. त्यामुळे याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
राजगड पोलिस आणि अपघातातील प्रत्यक्षदर्शीनी याबाबत माहिती दिली. सदर अपघात झालेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता.
रस्त्यावर मोठा पत्रा आडवा पडल्याने सदर ठिकाणी एक एस टी बस, एक पिक अप, एक मोटारगाडी ही तीन वाहने थांबली होती. तितक्यात पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोटरगाडी उड्डाणपुलावरुन खाली कोसळली. तर एस टी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुलावरून कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार
विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर अपघातातील जखमींना मदत करणे, रस्त्यावरील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करणे, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गस्त पथकाचे काम आहे.
मात्र सदर ठिकाणी अपघातानंतर सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघात स्थळी आली नाही. त्यामुळे खाजगी क्रेन लावून या अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली. मात्र या झालेल्या उशीरामुळे याठिकाणी सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
ठेकेदाराचे बिल थकल्याने क्रेन पाठवल्या नाहीत
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अपघतात तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत क्रेन पुरविण्याचा ठेका देण्यात आला आहे.
या ठेकेदाराचे बिल थकले असल्याने त्याने आज क्रेन अपघात स्थळी पाठवल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला इतर क्रेनची जमवा जमव करण्यास उशीर झाला, असे पेट्रोलिंग पथकाचे बी. जे. शर्मा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.