सुपे (ता.बारामती) : गावाजवळ उतारावर कंटेनर उलटून घसरून उभ्या असलेल्या दोन मोटारींवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात नऊ जण जखमी झाले असून, पाच गंभीर जखमी झाले आहेत. नगर जिल्ह्यातील खडकी येथील सर्वजण जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते. सुपे-मोरगाव मार्गावर सोमवारी सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात झाला.(Supe Morgaon road accident news)
अपघातातील जखमींची नावे अशीः बाबासाहेब वाडेकर, स्वाती नवनाथ रोकडे, संध्या अनिल रोकडे, तात्या काळे, काजल विठ्ठल कोकरे, नाथा सतीश रोकडे, अंबादास भाऊसाहेब रोकडे, नवनाथ रोकडे, विठ्ठल शिवाजी कोकरे. अपघात घडला त्यावेळी कंटेनर कोसळ्याचा मोठा आवाज आल्याने गावकरी मदतीसाठी धावले. जखमींना तातडीने सुपे ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चाफाकारंडे यांनी जखमींवर उपचार केल्याची माहिती डॉ.दिलीप झेंडे यांनी दिली. दरम्यान, पोलीस उपनिरिक्षक एस.जी.शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालक फरारी झाल्याचे शेख यांनी सांगितले.
दोन मोटारींमधून महिला-मुलांसह १४ जण प्रवास करत होते. सुप्यात चहा घेऊन गाडीत बसत असतानाच पाठीमागील उतारावरून वळणावर एक कंटेनर उलटून घसरत सुमारे ३०-४० फुटांवर थांबलेल्या या गाड्यांवर आदळला. काही क्षणात झालेल्या या अपघातात गाडीत बसलेले व बसत असलेले जखमी झाले. कंटनेरच्या धडकेने दोन गाड्यांमधील एक गाडी रस्त्याच्या विरूद्ध बाजुला सुमारे अडिचशे फुटांवर सागर लोणकर यांच्या चहाच्या हॉटेल जवळ जाऊन थांबली. सुदैवाने हॉटेल बाहेर ग्राहक नव्हते व रस्त्यावर अन्य वाहने नव्हती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. रस्त्याच्या कडेला फळ विक्रेते थांबतात तेही या वेळी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात हॉटेल डायमंडची पडझड होऊन नुकसान झाले.
सुपे येथील संपतराव जगताप, अभिनय कुतवळ, अनिल हिरवे, नूरमहंमद शेख, अरविंद भोंडवे, सोहेल काझी, संजय राऊत आदींनी जखमींना उपचारासाठी स्वतःच्या गाडीने व रूग्णवाहिकेद्वारे तातडीने रूग्णालयात पोहचवले. सुप्यातून मोरगावकडे व चौफुल्याकडे जाणाऱ्या या मार्गावर तीन रस्ते फुटतात. याठिकाणी गोल दुभाजकाची, चढ कमी करण्याची व रस्ता रूंदी करणाची व काही दुकाने मागे घेण्याची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.