Pune Accident Esakal
पुणे

Pune Accident: बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेला कंटेनरने चिरडलं, अपघातात एकाचा मृत्यू तर ४ शाळकरी मुलं जखमी

Pune Accident: कंटेनरने धडक दिल्याने स्कूल बस, एक मोटारगाडी, दोन मोटार सायकली व दोन टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे - मुंबई महामार्गावर येथील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉपसमोर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात पाठीमागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर सर्व्हिस रस्त्यावर घुसला. यावेळी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कंटेनरने धडक दिल्याने स्कूल बस, एक मोटारगाडी, दोन मोटार सायकली व दोन टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

लता रणजीत जाधव ( वय ४० वर्षे, रा. कुडे वाडा, वडगाव मावळ ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप झालटे ( वय ४० वर्षे, रा.वडगाव मावळ ), सृष्टी भाटेकर ( वय १५ वर्षे, रा. वडगाव मावळ), मैत्रेय भवार ( वय ११ वर्षे, रा.वडगाव मावळ ), मृणाल भवार ( वय १४ वर्षे, रा. वडगाव मावळ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास काही प्रवासी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते. स्टॉप समोर महामार्गावर एक शाळेची बस थांबलेली होती. यावेळी मुंबई वरून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर हा पुढे उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रस्त्याकडे घुसला व एक मोटारगाडी, दोन मोटारसायकलींना धडक देऊन एका टपरीत घुसला.

या अपघातात बसची वाट पहात बस स्टॉपवर उभी असलेली महिला कंटनेरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली तर शाळकरी मुले जखमी झाली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती. अपघात ग्रस्त कंटेनर तेथून बाजूला केल्यानंतर ती सुरळीत झाली. दरम्यान, येथील छेदरस्ता अपघाताचा ब्लॅक स्पॉट झाला असून महामार्ग ओलांडताना येथे अनेकदा अपघात झाले आहेत. रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने येथे सुरक्षा विषयक उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT