बारामती - नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी आज कारवाई करत नॉयलॉन मांजा विक्री करणा-यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसात नॉयलॉन मांजामुळे काही जण जखमी झाले होते. या बाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी मांजा विक्रेत्यांकडे तपासणी मोहिम राबवली.
महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, सहाय्यक फौजदार संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, मनोज पवार, कल्याण खांडेकर, अजित राऊत, बंडू कोठे, अक्षय सिताप यांची वेगवेगळी पथके तयार करून मार्केट मधील बारा दुकाने तपासली गेली.
यात काशिविश्वेश्वर मंदीरानजिक नॉयलॉन मांजा विक्री करताना शाहरुख निसार अत्तार सापडल्यानंतर शहर पोलिसांनी त्यांच्या विरुध्द कारवाई केली आहे. त्यांच्या दुकानात विविध रंगांचे 17 नॉयलॉन मांजाचे बंडल पंचासमक्ष जप्त केले गेले. त्यांच्या विरोधात बारामती शहर पोलिसात 188, 336,278 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण अधिनियमांचे उल्लंघनाप्रकरणी ही कारवाई झाली.
या पुढील काळातही शहर पोलिस ही मोहिम राबविणार आहेत, कोणीही चायनीज किंवा नॉयलॉन मांजा विक्री करु नये, यात कोणी जखमी झाले तर विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरवर्षी नागपंचमीला बारामती शहर व पंचक्रोशीत पतंग उडविल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.