Mahavitaran esakal
पुणे

अकार्यक्षम वीज मीटर रीडिंग एजन्सींवर कारवाई

पुणे प्रादेशिक विभागअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ११० मीटर रीडिंग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींची महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्या उपस्थित नुकतीच बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे प्रादेशिक विभागअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ११० मीटर रीडिंग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींची महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्या उपस्थित नुकतीच बैठक झाली.

पुणे - गेल्या दोन महिन्यांपासून अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे आदी प्रकार दिसल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दोन व सोलापूर जिल्ह्यातील तीन, अशा पाच मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले. शिवाय, संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभागअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ११० मीटर रीडिंग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींची महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्या उपस्थित नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), सचिन तालेवार, सुनील पावडे, परेश भागवत उपस्थित होते. एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुरुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींचे सादरीकरण करून माहिती देण्यात आली. त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीच्या संचालकांना यावेळी उपाय सांगितले.

या वेळी ताकसांडे म्हणाले, ‘मीटर रीडिंग हा बिलींगचा मुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु, चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु, रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सी व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही एजन्सीने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाहीत, तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT