Pune News  sakal
पुणे

Pune News : ‘रूफटॉप’वर आजपासून कारवाईचा बडगा

कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, खराडी, घोरपडी, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, रूफटॉप हॉटेल, बार यांचे बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणांवर बुधवारपासून (ता. २१) कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, खराडी, घोरपडी, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, रूफटॉप हॉटेल, बार यांचे बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणांवर बुधवारपासून (ता. २१) कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील पूर्व भागात शेकडो रेस्टॉरंट आणि बार मालकांनी ‘अॅटमॉस्फियर म्युझिक’ असा गोंडस शब्द वापरून डान्स फ्लोअर बनवले आहेत.

या ठिकाणी पब म्हणून व्यवसाय केला जातो. त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे पूर्व भागातील रहिवासी संतप्त झाले आहेत. यातून वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे कल्याणीनगरमध्ये दोन तरुण संगणक अभियंत्यांना अपघातात जीव गमवावा लागला. याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार यांचे वाढीव बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

त्यानुसार मंगळवारी (ता. २१) महापालिकेचा बांधकाम विभाग आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पूर्व भागातील हॉटेल, रेस्टॉरंट बार, रूफटॉफ हॉटेलची तपासणी केली. वडगाव शेरी हद्दीतील कल्याणीनगर जवळ असलेल्या बॉलरसहित इतर काही पब बांधकाम अधिकाऱ्यांनी तपासले. तसेच विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क, घोरपडीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पबही तपासले.

जुना मुंढवा रस्त्यावर सुंदरबाई मराठे शाळेशेजारच्या भागात, खराडी, विमाननगर येथे दत्त मंदिर चौकात, कोणार्कनगर तसेच कल्याणीनगरमध्ये अनेक ठिकाणी रहिवासी बंगल्यांचे रूपांतर हॉटेलमध्ये केले आहे. त्यांच्या पुढच्या बाजूला पार्किंगच्या जागेत रेस्टॉरंट बनविले आहेत. काहींनी टेरेसवर सोलार सिस्टीम बसवून त्याखाली रेस्टॉरंट सुरू केले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सर्व प्रकार माहीत आहेत. त्यामुळे आता खरंच कारवाई होते का? की कागदी घोडे नाचविले जातात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

२० पैकी नऊ रूफटॉप हॉटेलवर बुधवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. इतर अनधिकृत बांधकाम केलेल्या आणि अतिक्रमण केलेल्या हॉटेलवरही सलग कारवाई सुरू होईल. किती हॉटेलवर कारवाई होणार? याचा संयुक्त अहवाल विविध भागांतून मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला. त्यानुसार कारवाईला सुरुवात होईल.

- रोहिदास गव्हाणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT