weighing machine sakal
पुणे

Pune News : अनधिकृत वजन काट्यांवर करणार कारवाई - डी. जी. महाजन

पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी आपापल्या दुकानांमधील विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काट्यांची दरवर्षी पडताळणी करणे बंधनकारक आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी आपापल्या दुकानांमधील विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काट्यांची दरवर्षी पडताळणी करणे बंधनकारक आहे. ही पडताळणी न करता वापरण्यात येणारे वजन काटे हे अनधिकृत आहेत. अशा अनधिकृत वजन काट्यांवर वैध मापन विभागाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वैध मापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक डी. जी. महाजन यांनी सांगितले.

राज्याच्या वैध मापन शास्त्र विभागाच्या वतीने वजन काट्यांच्या अचूकतेची पडताळणी केली जाते. यानुसार सर्व विक्रेत्यांनी आपापल्या दुकानांमध्ये अचूकतेची पडताळणी केलेली वजने, मापे व तोलन उपकरणांचा वापर करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.

ही पडताळणी करून न घेतलेली सर्व वजन, मापे, काटे आणि वजन तोलन उपकरणे ही अनधिकृत ठरतात. अशा अनधिकृत वजन काट्यांची विक्री करणे आणि वापर करण्यावर बंदी आहे. त्यामुळे अशी अनधिकृत वजन, मापे आणि काट्यांचा वापर न करण्याचे आवाहन वैध मापनशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यामुळे वजने व मापे यांचा वैध विक्री परवाना असलेल्या सर्व परवानाधारकांनी वैध वजने, मापे व तोलन उपकरणांची विक्री करणे आवश्यक असतानासुद्धा काही व्यापारी विविध देशातून आयात केलेले (चिनी बनावटीचे) किंवा अन्य राज्यातून आणलेले अप्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स काट्यांचा वापर करतात. तसेच काही व्यक्ती हे वजन काट्यांना त्यांचे स्टिकर लाऊन बेकायदेशीपरणे विक्री करत असल्याचे वैध मापन कार्यालयाच्या निदर्शनास आलेले असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT