पुणे : 'कोरोना'च्या संकटात सर्व भेद विसरून गरीबांना मदत करा असे आवाहन केले जात आहे. मात्र, बालेवाडी परिसरातील एका राजकीय व्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी केवळ आपले मतदार नाहीत म्हणून गरीब कष्टकऱ्यांना मदत नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'कोरोना'मुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कष्टकरी, मजूर गरीबांच्या हाताला काम नसल्याने ते पुढचे काही आठवडे कसा उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न त्यांना पडला आहे. शहरात सामजिक संस्था संघटना मदत करत असल्या तरी अद्याप अनेक जण उपेक्षीत आहेत.
पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण
पुण्यात राजकीय लोक ही गरीबांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत, पण यात मतदार आणि बाहेरचे असा भेदभाव सुरू आहे. रविवारी बालेवाडी परिसरात एका राजकीय व्यक्तीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरीबांना धान्य वाटप सुरू केले.
शिक्षणमंत्री म्हणतात, परीक्षा रद्द; अन् हे मुख्याध्यापक म्हणतात, परीक्षा घेणारच!
एका वस्ती वर गेले असता तेथे काही पश्चिम महाराष्ट्रातील मजूर तर काही परप्रांतीय मजूर रांगेत थांबले, पण त्यांच्याकडे रेशनकार्ड किंवा मतदार कार्ड नव्हते. त्यावेळी तुम्ही इथले मतदार नाहीत त्यामुळे तुम्हाला धान्य मिळणार नाही असे सांगून पिटाळून लावले. असाच प्रकार तीन दिवसांपूर्वी बाणेर मध्ये घडला होता.
Lockdown : ऑनलाईन सेवेद्वारे केवळ जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा होणार
हाताला काम नाही, पैसा नाही त्यामुळे गरीब लाेक मदतीच्या शोधात आहेत, असे असताना राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने या वृत्तीबद्दल चर्चा रंगली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.