Pune Traffic sakal
पुणे

Pune Traffic : पुण्यातील ३२ रस्त्यांवरील कोंडीवर ‘मार्ग’ ; अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील, ‘वाहतूक सुधारणा प्रकल्पा’चे सादरीकरण

शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक क्षमतेहून अधिक वाढलेली वाहनांची संख्या, अतिक्रमणे, खड्डे, बॉटलनेक, अनावश्यक गतिरोधक अशा कारणांमुळे कोंडी आणि अपघात होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक क्षमतेहून अधिक वाढलेली वाहनांची संख्या, अतिक्रमणे, खड्डे, बॉटलनेक, अनावश्यक गतिरोधक अशा कारणांमुळे कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यावर अभ्यासपूर्ण ‘मार्ग’ काढण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवरील वाहतुकीची सद्यःस्थिती, त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत शुक्रवारी (ता. २) बंडगार्डन रस्ता परिसरात आयोजित एका बैठकीत अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी ‘वाहतूक सुधारणा प्रकल्पा’चे सादरीकरण केले. या प्रकल्पाची १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी त्यांनी बोट क्लब, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर भागांतील रहिवाशांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते. लीला पूनावाला फाउंडेशनच्या विश्‍वस्त रोडा मेहता, सामाजिक कार्यकर्त्या साथी नायर, डॉ. नीता मुन्शी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी कोरेगाव पार्क, बोट क्लब, कल्याणीनगर परिसरातील वाहतूक अभ्यासक आणि नागरिक उपस्थित होते.

पुण्यातील प्रमुख ३२ रस्ते

सोलापूर रस्ता, नोबेल हॉस्पिटल खराडी बायपास, नॉर्थ मेन रस्ता ते सोलापूर रस्ता, सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, नगर रस्ता, कान्हेरे रस्ता, नवीन विमानतळ रस्ता, जुना विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता,

शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, संताजी घोरपडे रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, सादलबाबा चौक, महात्मा गांधी रस्ता कॅम्प, प्रिन्स ऑफ वेलस्ली रस्ता, कोंढवा रस्ता, जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता.

नागरिकांची जबाबदारी

वाहतूक नियमांचे पालन करणे, नो पार्किंगमध्ये वाहने न लावणे, रस्त्यांवर अतिक्रमण न करणे, पोलिसांना वाहतूक नियमनास मदत करणे

वाहतुकीसमोरील आव्हाने

  • शहरात वाहनांच्या क्षमतेच्या तुलनेत रस्त्यांचे क्षेत्र कमी

  • सध्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर १७ टक्के (तो किमान ५० टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज)

  • रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यास वाहतुकीवरील ताण कमी होणार

  • वाहनांची संख्या ३८ लाख ५० हजार (वर्ष २०२३-२४)

  • रस्त्यांची क्षमता तेवढीच; पण एका वर्षात नव्याने तीन लाख वाहने रस्त्यावर

प्रमुख ३२ रस्त्यांवरील उपाययोजना

  • वाहतूक क्षमता वाढविण्यासह मिसिंग लिंक जोडून क्षमता सुधारणे

  • एकेरी मार्ग, यू-टर्न, वळण्यावर बंदी, पार्किंग व्यवस्था, सिग्नल व्यवस्थेत सुधारणा, दिशादर्शक फलक, आवश्यक ठिकाणी दुभाजक आणि पंक्चर्स, रस्ते सुरक्षिततेसाठी तांत्रिकदृष्ट्या सुधारणा

नियमांची अंमलबजावणी

  • विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

  • महापालिका प्रशासनाच्या समन्वयाने अतिक्रमण दूर करणे, सिग्नल दुरुस्ती, खड्डे बुजविणे, चौक सुधारणा,

  • वाहतूक अभियांत्रिकी सल्लागाराची नियुक्ती

संपर्क क्रमांक

  • नियंत्रण कक्ष : ०२०- २६६८४००००

  • व्हॉट्सॲप क्रमांक : ८०८७२४०४००

  • ट्विटर @punecitytraffic

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT