Aditya L-1 sakal
पुणे

Aditya L-1 : ‘आदित्य एल-१’ चे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी उड्डाण होण्याची शक्यता

तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम ‘आदित्य-एल १’ प्रत्यक्षात येत असून, येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी तिचे उड्डाण होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

सम्राट कदम

पुणे - तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम ‘आदित्य-एल १’ प्रत्यक्षात येत असून, येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी तिचे उड्डाण होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘लॅग्रांजीयन पाईंट’ पर्यंत पोचण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. अन्यथा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी आवश्यक उपकरण आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राने विकसित केले आहे. त्यासंबंधीची माहिती देत असताना शास्त्रज्ञांनी उड्डाणाची संभाव्य तारीख सांगितली. जानेवारी २००८ मध्ये संकल्पनेच्या स्वरूपात अस्तित्वात आलेल्या आदित्य एल-१ मोहिमेला २०१६-१७ मध्ये बजेट प्राप्त झाले होते. मोहिमेसाठी आवश्यक सर्व सातही उपकरणे (पेलोड) आता सज्जा झाले असून, सर्वांनाच आता इस्रोच्या उड्डाणाची प्रतिक्षा आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास सौर मोहिमा यशस्वी करणाऱ्या अमेरिका आणि युरोपिय युनियनच्या पंक्तीत भारताला स्थान मिळेल. मान असेल.

सौर मोहिमेची आवश्यकता का?

विश्वाबद्दलची आपली समज आणि त्याचा आपल्या ग्रहावर होणार प्रभाव समजण्यासाठी सूर्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. सूर्य हा पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा असून, पृथ्वीवरील जीवनाचे संचालन त्याच्याकडून होते. कारण तो प्रकाश, उष्णता आणि ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे.

अंतराळातील हवामान आणि भू-अंतरिक्षातील हवामानावर सूर्याचा प्रभाव पडतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी सूर्यामधून सतत उत्सर्जित होणाऱ्या चार्ज कणांचा संपर्क येतो, ज्याला सौर वारा म्हणून ओळखले जाते आणि अरोरासारख्या विविध अवकाशीय हवामानाच्या घटना घडतात त्याच्या अभ्यासासाठी सौर मोहिमेची आवश्यकता.

आजवरच्या सौर वेधशाळा....

सोलर अँड हेलिओस्फेरिक वेधशाळा, सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी, हिनोड सोलर टेरेस्ट्रियल रिलेशन्स ऑब्झर्व्हेटरी आणि अगदी अलीकडे इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ, पार्कर सोलर प्रोब आणि सोलर ऑर्बिटर.

आदित्य एल-१ -

ही सौर अभ्यासासाठी इस्रोची पहिली अंतराळ वेधशाळा आहे. जी पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या लॅग्रेंज पॉइंटभोवती सूर्याला प्रदक्षिणा घालणार आहे. सूर्यावरील घडणाऱ्या विविध घटनांचा पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये अभ्यास करण्यासाठी, तसेच सौर वादळांच्या सूचनेसाठी सात वेगवेगळ्या पेलोड्सना आदित्य एल-१ मध्ये आहे. यामध्ये हार्ड एक्स-रे ते इन्फ्रारेड पर्यंत सौर किरणोत्सर्गाचे अखंड मापन केले जाईल. तसेच एल-१ बिंदूंवरील सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रासह सौर वाऱ्यातील कणांचे निरीक्षणही घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT