Crime sakal
पुणे

Pune News : न्यायालयाची स्थगिती उठताच विनापरवाना मॉलवर कारवाई

विनापरवाना शॉपिंग मॉलवरील कारवाईची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने तेथील ७० स्टॉलवर कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) शिरोळे प्लॉटमधील विनापरवाना शॉपिंग मॉलवरील कारवाईची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने तेथील ७० स्टॉलवर कारवाई केली. यामध्ये ७ हजार चौरस फुटाची जागा अतिक्रमण मुक्त केली.

शिरोळे प्लॉटमध्ये लोखंडी एंगल, गर्डर पत्र्यांच्या सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. यामध्ये ७० दुकाने होती. महापालिकेने या ठिकाणी कारवाईची नोटीस बजावल्यानंतर यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर स्थगिती देण्यात आल्याने गेल्या आठ वर्षापासून महापालिकेला कारवाई करता आलेली नव्हती.

दरम्यान, महापालिकेने उच्च न्यायालयात स्थगिती उठवली, पुन्हा त्यावर स्थगिती येऊ नये यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर आज (ता. ४) तातडीने कारवाई करून ७ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.

या विनापरवाना मॉल मुळे गोखले रस्त्यावर वाहतुकीवर ताण येणे, मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाली असती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कपड्याच्या दुकानांची संख्या जास्त होती, कारवाई करताना आग लागण्याची शक्यता असल्याने अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते.

यामध्ये एक जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, १५ बिगारी व पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला, अशी माहिती उप अभियंता सुनील कदम यांनी दिली.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस, महापालिकेचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडइ यांनी ही कारवाई पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT