Digital Hoarding sakal
पुणे

Advertise : पुणे शहरात जाहिरातबाजी जोरात, पण परवाना नूतनीकराणाला ठेंगा

पुणे शहरातील १ हजार २१७ होर्डिंगच्या परवान्यांची मुदत संपलेली असली तरी व्यावसायिकांनी महापालिकेकडे शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - शहरातील १ हजार २१७ होर्डिंगच्या परवान्यांची मुदत संपलेली असली तरी व्यावसायिकांनी महापालिकेकडे शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण दुसरीकडे हे व्यावसायिक परवाना संपलेल्या होर्डिंगवरून जाहिराती प्रदर्शित करून नफा कमातव असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने होर्डिंग नूतनीकरणासाठी आता ३० नोव्हेंबर ही अखेरची मुदत दिली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत २६६ परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे.

शहरात महत्त्वाचे चौक, रस्ते या ठिकाणी इमारती, मोकळ्या जागांवर लोखंडी सांगडा उभारून त्यावर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा मोठा व्यवसाय शहरात आहे. यापूर्वी होर्डिंगसाठी प्रतिचौरस फूट २२२ रुपये इतके शुल्क आकारले जात होते. पण एप्रिल २०२३ पासून हे शुल्क प्रति चौरस फूट ५८० रुपये इतके करण्यात आले आहे.

महापालिकेने गेल्या १० वर्षापासून शुल्क वाढविले नव्हते, पण गेल्या १० वर्षाचे प्रतिवर्ष १० टक्के या प्रमाणे वाढ गृहित धरून हे शुल्क ५८० रुपये इतके केले आहेत. याविरोधात काही होर्डिंग व्यावसायिकांनी याचिका दाखल केलेली असली तरी त्यावर दिलासा मिळालेला नाही.

दरम्यान आकाशचिन्ह विभागाच्या अहवालानुसार १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी १ हजार ८१२ होर्डिंगचे परवाने नूतनीकरण होणे आवश्‍यक आहे. पण महापालिकेने शुल्कवाढ केल्याने व्यावसायिकांनी शुल्क भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रशासनाने यासंदर्भात बैठक घेतली असता केवळ २४५ व्यावसायिकांनी परवाना नूतनीकरण केल्याचे समोर आले.

त्यामुळे सात दिवसात शुल्क भरून परवाना नूतनीकरण न केल्यास होर्डिंग बेकायदा ठरविण्यात येईल असा इशारा दिल्यानंतरही गेल्या १० दिवसात केवळ १९ जणांनी पैसे भरून परवाना नूतनीकरण केले आहे. सध्या एकूण २६६ जणांनीच नूतनीकरण केले असून, त्याबदल्यात १ कोटी६७ लाख ७१ हजार १७५ रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. तर ३२९ जणांचे प्रस्ताव महापालिकेच्या स्तरावर प्रलंबित आहेत.

१ हजार २१७ +होर्डिंग व्यावसायिकांनी अद्याप महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केलेला नाही. त्यामुळे या होर्डिंगवर जाहिरातबाजी जोरात सुरु असली तरी महापालिकेला त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. शुल्क न भरल्याने सुमारे २० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ३० नोव्हेंबर ही नूतनीकरणाची शेवटची मुदत दिलेली आहे.

‘शहरातील १ हजार ८१२ होर्डिंगची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेली आहे. या व्यावसायिकांनी ५८० रुपये प्रति चौरस फूट या प्रमाणे शुल्क भरून पुढील तीन वर्षासाठी परवाना नूतनीकरण करणे आवश्‍यक आहे. या व्यावसायिकांनी ३० नोव्हेंबर ही अखेरची मुदत दिली असून, या काळात परवाना नूतनीकरण केले नाही तर होर्डिंग काढून टाकण्याची कारवाई केली जाईल.’

- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

पाच क्षेत्रीय कार्यालयात शून्य नूतनीकरण

महापालिकेचे १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यापैकी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय, औंध बाणेर, घोडे रस्ता शिवाजीनगर, कोथरूड बावधन, वारजे कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तब्बल ८५८ होर्डिंग आहेत. पण गेल्या आठ महिन्यात तेथील एकाही होर्डिंगचे नूतनीकरण झालेले नाही. यापैकी २२६ जणांचे प्रस्ताव प्रशासनाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

  • परवाना नूतनीकरणासाठी अपेक्षीत प्रस्ताव - १८१२

  • परवाना नूतनीकरणासाठी दाखल प्रस्ताव - ३२८

  • परवाना नूतनीकरण झालेले होर्डिंग - २६६

  • महापालिकेला मिळालेले शुल्क - १.६७ कोटी

  • प्रस्ताव दाखल न केलेले होर्डिंग - १२१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT