Sharad Pawar eSakal
पुणे

Sharad Pawar: शरद पवारांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला; वाचा ते नक्की काय म्हणाले!

Latest Maharashtra News : स्व.झांबरशेठ व स्व.विलासराव तांबे यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळ्या पार पडला.त्यावेळी शरद पवार बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

Junnar: जुन्नर तालुक्याची शेतीतील प्रगती व शैक्षणिक प्रगतीत स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण तांबे (झांबरशेठ) व शिक्षणमहर्षी स्वर्गीय विलासराव तांबे यांचा मोठा वाटा असून जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी तांबे कुटुबीयांचे मोठे योगदान आहे.

झांबरशेठ व लताताई तांबे याच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली व त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले.जुन्नर तालुक्यातील लोकांचे जीवन कसे समृद्ध होईल याच्या शिवाय दुसरा विचार झांबरशेठ यांनी केला नाही.तर शिक्षणमहर्षी स्वर्गीय विलासराव तांबे यानी शून्यातून शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे करून शिक्षणाच्या संधी उभ्या करून दिल्या असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.सध्या शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या वाढत आहे,

मात्र जमिन आहे तेव्हढीच आहे.त्यामुळे शेतकरी कुटुंबाने शेती एक शेती करून यापुढे चालणार नाही तर कुटुंबातील एकाने शेती करून इतरांनी शेती व्यतिरिक्त इतर नोकरी धंदा करावा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

ओतूर ता.जुन्नर येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रविवार जुन्नर तालुक्याचे आमदार स्वर्गीय श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ, जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार स्वर्गीय लतानानी तांबे व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी स्व.विलासराव तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.तसेच स्व.झांबरशेठ व स्व.विलासराव तांबे यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळ्या पार पडला.त्यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार अतुल बेनके,विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर,ओतूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे,श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे,सचिव वैभव तांबे,ओतूरच्या सरपंच छाया तांबे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,माजी आमदार दिलीप ढमढेरे,बाळासाहेब दांगट,शरद सोनवणे,कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे,देवदत्त निकम,माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे,बाजीराव ढोले,विशाल तांबे, माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले,अंकुश आमले,देवराम लांडे,शरद लेंडे,तुषार थोरात,माऊली खंडागळे,अनंतराव चौगुले,अनिल मेहेर,निलम तांबे ,इंदिरा अस्वार,सुरेख वेठेकर,धनंजय डुंबरे,अशोक घोलप,माधवराव डुंबरे तसेच ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व ओतूर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी स्वगत ओतूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी प्रास्ताविकात श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी केले.सुत्रसंचलन भाऊसाहेब खाडे यांनी तर आभार मोहित ढमाले यांनी मानले.

यावेळी डॉ.अमोल कोल्हे म्हणाले पन्नास वर्षापूर्वी स्वर्गीय आमदार झांबरशेठ यांची केलेल्या कार्य कर्तृत्वाला आज आम्ही नतमस्तक होतो.ती नितीमत्ता ती तत्वनिष्ठा आजच्या काळात राहिली का ? असा प्रश्न आजच्या राजकारणातचा विचार केला की उभा राहतो.माळशेज घाटाचे प्रणेते झांबरशेठ यानी जर विकासाच्या नावावर भूमिका बदलली असती तर जनतेच्या मनात त्याचा पुतळा उभारताना शंका निर्माण झाली असती असा चिमटा अतुल बेनके यांचे नाव न घेता कोल्हे यांनी काढला.महाराष्ट्राला काळीमा फासणारी बदलापूर सारखी घटना घडते,त्यावेळी शासनाचे लोकप्रतिनिधीं फक्त शासनाच्या घोषणाची जाहिरात करण्यामधी मश्गूल राहत असतील तर यावेळी जनतेने जागे होऊन या लोकप्रतिनिधीना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.ओतूर ही धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिर असलेली भूमि असून सत्यशोधक समाजाची ही भूमि आहे.त्यामूळे ही माती लोक सेवेचीच नसून ती क्रांतीची आहे.

आमदार अतुल बेनके म्हणाले सत्ता,साधन,संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते ही अशी शिकवण आदरणीय शरद पवार साहेबांनी व माझे वडीलांनी मला दिली आहे.मताच्या राजकारणा पेक्षा विकासाच्या राजकारणतून पुढे जायचे असते ही शिकवण दिली आहे.येथून पुढे ही डॉ.अमोल कोल्हे यांच्या बरोबर आम्ही सर्व जण मिळून विकासासाठी पुढे जाण्यास कटिबद्ध असल्याचे त्यानी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT