पुणे : प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पवार कुटुंबिय एकत्र आले होते. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली. कुटुंबियांच्या स्नेहभोजनानंतर अजित पवार हे दिल्लीकडं रवाना झाले.
हा सोहळा उरकल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, असा सवाल केला. यावर त्यांनी उत्तर दिलं. (after meeting with family and Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar gives first reaction)
प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंबिय एकत्र आले होते. ही कौटुंबिक भेट होती. यावेळी सहकुटुंब जेवणही झालं. खूप दिवसांनी आम्ही सर्व भावंड एकत्र जमलो भेटून सर्वांना आनंद वाटला. यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी दिली होती. हीच माहिती शरद पवार यांनी पुन्हा माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
"आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी अधिक काही भाष्य करणं टाळलं यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये पत्नी प्रतिभा पवार या देखील होत्या. माध्यमांच्या प्रतिनिधींशी अधिक काही न बोलता त्यांनी पुढे जाण पसंद केलं.
पवार कुटुंबियांच्या भेटीपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या पुण्यातील 'मोदी बाग' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आणि दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.