again illegal sell of Remdesivir in Pune black market 
पुणे

पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरलेल्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा शहरात पुन्हा काळा बाजार सुरू झाला आहे. खरेदीवर दहा टक्के आकारून रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध करून द्या, या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सूचनांना केराची टोपली दाखवत रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांमधून छापील किंमतीत (एमआरपी) याची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसते. शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रेमडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. राज्याला मिळणाऱ्या या इंजेक्शनपैकी तब्बल ५० टक्के साठा पुणे विभागाला मिळतो. त्यापैकी बहुतांश इंजेक्शन हे पुणे शहर आणि जिल्ह्यांमध्ये वितरित केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रुग्णांना रेमडिसिव्हिर इंजेक्शन लिहून देण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसते. त्याचा थेट परिणाम शहरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसते.

कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार होणाऱ्या रुग्णालयांच्या किंवा त्या परिसरातील औषध दुकानांमध्ये रेमडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. इतर ठिकाणांहून त्याच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना इतर औषध दुकानांमधून हे इंजेक्शन मिळत नाही, असेही रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

या बाबत अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, “खरेदी किमतीवर दहा टक्के आकारून रेमडिसिव्हिरची विक्री करावी. रुग्णांच्या नातेवाइकांनीही याची खरेदी करताना बिल मागावे. आपल्याकडून जास्त दराने पैसे घेतले आहेत का, याची खात्री करावी. जास्त पैसे आकारले असल्यास त्याची तक्रार ‘एफडीए’कडे करावी.’’

वीस हजार इंजेक्शनचा साठा
''राज्याला वेगवेगळ्या सात औषध निर्माण कंपन्यांकडून रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होतो. शहरात सध्या २० हजार ६३५ इंजेक्शनचा साठा आहे. या इंजेक्शनची सर्वाधिक मागणी पुणे शहरातून होत आहे. त्यासाठी इतर विभागाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के साठा विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना वितरित केला जातो. त्यापैकी बहुतांश साठा हा पुणे शहराला दिला जात आहे'', अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

Salman Khan: ''आमची गँग अ‍ॅक्टिव्ह आहे'' सलमान खानला पुन्हा धमकी; लॉरेन्सचा भाऊ बोलत असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT