aggregate age of youth committing crime is Twenty five year old in Pune 
पुणे

नोकरी धंदा करण्याच्या वयात तरुणांची गुन्हेगारीत एंट्री; पुण्यात 12 दिवसात 7 खून...

सकाळवृत्तसेवा

पुणे : संयमाचा बांध सुटल्याने पूर्वी झालेल्या अगदी किरकोळ वादातून देखील खून होत असल्याचे प्रकार पुण्यात होत आहेत. गेल्या 12 दिवसात शहरात सात खून झाले असून त्यातील धक्कादायक बाब म्हणजे तीन गुन्ह्यातील 21 आरोपींचे वय 25 वर्षाच्या आत आहे. शिक्षण पूर्ण होऊन नोकरी-धंद्याची सुरुवात करण्याच्या वयातच काही तरुण खुनासारख्या गंभीर गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी कमी झाली होती. मात्र लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर मिळालेल्या सवलतींच्या काळापासून शहरात खुनासारखे गंभीर प्रकार पुन्हा सुरू झाले असून त्यातील तरुणाईचा सहभाग चिंता वाढवणारा आहे. एवढेच नाही तर यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून त्याच देखील कमी वयाचे गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
25 मेपासून कोंढवा, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क वानवडी, हडपसर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक तर येरवड्यात दोन खून झाले आहेत. त्यातील तीन गुन्हे पूर्वी झालेल्या भांडणातून घडले आहेत. तर दोन हत्या या अज्ञात इसमांनी केल्या असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात शिक्षणासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी येत असतात. चांगले शिक्षण घेऊन भविष्यात नाव कमावता येईल यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. तर दुसरीकडे यातीलच काही तरुण शिक्षण पूर्ण करून उज्वल भविष्यासाठी नोकरी-धंद्याची सुरुवात करण्याच्या वयातच गुन्हेगारीत इंट्री करत आहेत. किरकोळ व गंभीर मारहाणीपासून अगदी खुनापर्यंत त्यांची मजल गेल्याची यातून स्पष्ट होते. पंचवीस वय पूर्ण होत नाही तेच खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींचे भविष्य काय असणार? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडत आहे. त्यामुळे आपल्या घरात 'डॉन' निर्माण होणार नाही ना. यांना चांगले वळण कसे लावता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून

( गेल्या 12 दिवसांत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी)
पोलिस ठाणे      आरोपीचे नाव                वय 

विश्रांतवाडी       इंद्रजीत गुलाब गायकवाड   23
                       निलेश विश्वनाथ शिगवण      24
                       सागर राजू गायकवाड         19
                       विजय बाबूराम फड            25
                       कुणाल बाळू चव्हाण           23  
कोरेगाव पार्क   संतोष मनसाराम चव्हाण      25
येरवडा            कुणाल किसन जाधव           20
                      अभिषेक नारायण खोंड        19 
                      अक्षय सतिश सोनवणे           24
                      आकाश  भगावान मिरे          23
                      अर्जुन दशरथ म्हस्के             19
                      राजविर रणजीतसिंग सौतरा   19
                      चेतन राजू भालेराव               19 
                      आकाश संजय सकपाळ        21 
                      निलेश लक्ष्मण पुंड               19 
                     गणेश उर्फ बापू आडसूळ      19
                     लक्ष्मण शिवाजी गजरमल       19
                     रिपेन्स रॉबर्ट चिनप्पा            19
                    आकाश वसंत कनचिले          19
                    प्रज्वल उर्फ पज्या बापु कदम  19  
                   ओंकार युवराज सोनवणे          19 
              (सहा अल्पवयीन मुले ताब्यात)
आता बांधकाम क्षेत्रात होणार शंभर टक्के परदेशी गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT