Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी हार्वर्ड विद्यापीठासोबत करार

प्रशांत पाटील

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी हार्वर्ड विद्यापीठासोबत करार करण्यात येणारआहे. यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना निम्या शुल्कात हार्वर्ड विद्यापीठाचे अभ्यासक्रम उपलब्ध होतील. यासाठी आगामी महिन्यात हार्वर्डसोबत करार करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

विद्यापीठाच्या दोन दिवसीय अधिसभेला शनिवारी सुरवात झाली. डॉ. करमळकर यांनी अधिसभेसमोर अहवाल सादर केला तेंव्हा त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘करारानुसार डेटा अॅनॅलिटीक्स, वाणिज्य, व्यवस्थापन अशा विषयांमध्ये प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांचे शुल्क ८०० ते १००० डॉलर्सच्या दरम्यान राहणार असून, अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. कराराची प्रक्रिया पूर्ण झाली की, काही दिवसांतच अभ्यासक्रमांना सुरवात होणार आहे.’’

गुणपत्रिकेच्या मागच्या बाजूस मिळणार टीसी -

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी ट्रान्स्क्रीप्ट सर्टिफिकेट(टीसी) आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना दहा दिवसांत मिळते, तर काहींना महिनाभर वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. याबाबत अधिसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर डॉ. नितीन करमळकर यांनी ट्रान्स्क्रीप्ट सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेच्या मागील बाजूस देण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT