Solar Power Project sakal
पुणे

Electricity Supply : शेतकऱ्यांना दिलासा! शेतीला मिळणार आता दिवसा वीजपुरवठा

सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीनंतर हजारो शेतकऱ्यांना दिवसा माफक दरात वीज उपलब्ध होणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शेतीला दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांत २७६ उपकेंद्रांसाठी एक हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यापैकी ९०० मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे.

सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीनंतर या उपकेंद्राच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना दिवसा माफक दरात वीज उपलब्ध होणार आहे. तसेच कडाक्याची थंडी, सर्पदंशाचा धोका, जंगली श्वापदांच्या हल्ल्याची भीती अशा संकटांना तोंड देऊन रात्री पिकांना पाणी देण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ या योजनेची वेगाने अंमलबजावणी केली जात आहे. त्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात ७१० उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५ हजार ९१५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.

त्याचे प्रकल्प उभारण्यासाठी आतापर्यंत ७ हजार ६६९ एकर सरकारी जमिनीचे अधिग्रहण केले आहे. पहिल्या टप्प्यात २७६ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी १९९१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले असल्याचे ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.

सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे फायदे

  • शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण होणार

  • कार्यान्वित सौरऊर्जा प्रकल्प हद्दीतील ग्रामपंचायतींना तीन वर्षे पाच लाखांचे अनुदान

  • प्रकल्पाची उभारणी, तो २५ वर्षे चालवणे आणि देखभाल-दुरुस्तीसाठी रोजगार निर्मिती

  • राज्याच्या ग्रामीण भागात सुमारे ६ हजार पूर्णवेळ, तर १३ हजार अर्धवेळ रोजगार निर्मिती

  • सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित करणाऱ्या ग्रामपंचायतींना अंदाजे २०० कोटींपेक्षा जास्त अनुदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT