air force notice to commercial buildings in wagholi sai-satyam park pune r Sakal
पुणे

Wagholi News : वाघोली साई -सत्यम पार्क परिसरातील अनेक व्यावसायिक इमारतीना वायु सेनेची नोटीस

साई सत्यम पार्क परिसरातील पुणे नगर महामार्गा लगत असणाऱ्या अनेक व्यावसायिक इमारतींना एअर कोमोडोर,सम्पदा अधिकारी, वायू सेना स्टेशन, पुणे यांनी नोटीस बजविल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - येथील साई सत्यम पार्क परिसरातील पुणे नगर महामार्गा लगत असणाऱ्या अनेक व्यावसायिक इमारतींना एअर कोमोडोर,सम्पदा अधिकारी, वायू सेना स्टेशन, पुणे यांनी नोटीस बजविल्या आहेत. त्या इमारत वायुसनेच्या जागेत असुंन अनाधिकृत असल्याचा उल्लेख त्या नोटीस मध्ये करण्यात आला आहे.

इमारती खाली करण्यासाठी १५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या विरोधात व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येथील सर्व्हे क्रमांक २८९ ( जुना गट क्रमांक २३४०, नवीन गट क्रमांक १३५४ / २ )

मधील जागा सार्वजनिक परिसर भारतीय संघराज्य (वायुसेना) च्या मालकीची आहे. अधिनियम, 1971 च्या कलम ५ ए (२) चे उल्लंघन करून वरील जागेवर अनधिकृतपणे इमारत बांधली आहे. या पूर्वी १७ मे २०२३ रोजीही नोटीस बजाविण्यात आली होती.

त्यावेळी व्यावसायिकांनी त्यांच्या जागेची कागदपत्रे वायू सेनेला सादर केली होती. त्याची पडताळणी देखील करण्यात आली. मात्र ही जागा वायुसेनेच्या मालकीची असून त्यावर अनधिकृतरित्या इमारत बांधण्यात आली आहे.

सार्वजनिक परिसर (अनधिकृत भोगवटादारांचे निष्कासन) अधिनियम १९७१ च्या कलम ५ ए च्या उपकलम (२) नुसार, तुम्हाला सार्वजनिक जागेवर बांधलेली इमारत काढून टाकण्याचे आवाहन करतो. ही नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत अनधिकृत इमारत का हटवू नये. हे कारणे दाखवा सादर करावे.

तुम्ही सादर न केल्यास किंवा इमारत न हटविल्यास किंवा दिलेले कारण पुरेसे नसल्यास इमारत हटवून त्याचा खर्च तुमच्या कडुन वसुल केला जाईल. असे स्पष्ट या नोटीस मध्ये उल्लेख करण्यात आले आहे. वायू सेनेने या परिसरात येवून दवंडी देत स्पीकर वरून इमारत खाली करण्याचे आवाहन देखील केले. ४ जानेवारी २०२४ रोजी नोटीस बजविण्यात आल्या आहेत.

अनेक वर्षापूर्वी व्यावसायिकांनी या जागा विकत घेतल्या. ज्यांनी या जागा विकल्या ते कमवून गेले. आता व्यावसायिकांचे मरण होणार आहे. त्यांची जागा होती तर वायू सेनेने यापूर्वीच ती ताब्यात घ्यायला पाहिजे होती. म्हणजे इमारती उभ्या राहिल्या नसत्या. प्रशासनानेही या कडे लक्ष घालावे.

- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT