Air pollution  sakal
पुणे

Pune Pollution: लक्ष्मीपुजनाच्या दिवशी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हवेची गुणवत्ता ढासाळली! पुणेकरांचा काळजी घेण्याचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवाळीचा आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना, पुणे शहरातील हवेचा दर्जा आता एकाच दिवसात खराब श्रेणीत पोचला आहे. मागील दोन दिवसांत मध्यम व समाधानकारक श्रेणीमध्ये असलेल्या हवेचा दर्जा आता पुन्हा खालावला आहे. लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सूक्ष्म धूलिकणांमध्ये दुप्पट वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता खालावली आहे.

येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही नोंद झाली आहे. हिवाळ्याची सुरुवात झाली तेव्हा पुण्यातील हवेचा दर्जा ढासळला होता. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम १०) वाढ झाल्याने शहराच्या मुख्य भागातील हवेची गुणवत्ता चक्क खराब श्रेणीपर्यंत पोचली होती.

तर एकूण पुण्याच्या हवेची गुणवत्ता कधी समाधानकारक तर कधी मध्यम श्रेणीत नोंदली जात होती. शुक्रवारी (ता. १०) शहर व परिसरात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावताच हवेतील हे धूलिकणदेखील वाहून गेले. त्यामुळे हवेची गुणवत्ता शनिवारी (ता. ११) पुन्हा ‘समाधानकारक’ या श्रेणीत पोचली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील वर्षी पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत नोंदली गेली होती. यंदा हवेची गुणवत्ता ढासळून खराब श्रेणीत आल्याने प्रदूषणाची समस्या वाढली आहे. थंडीच्या काळात हवेचा वेग ही मंदावतो, परिणामी जमिनीलगतचे तापमान कमी असल्याने हवेतील प्रदूषणाचे धूलिकणदेखील जमिनीलगतच्या थरात राहतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत हवेची गुणवत्ता खराब होते.

हिवाळ्यात आधीच सर्दी खोकल्याचे आजार उद्‍भवतात, त्यात आता हवेची गुणवत्ता ढासळल्याने आरोग्याच्या समस्यादेखील वाढू शकतात. दरम्यान, सफर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार रविवारी (ता. १२) शिवाजीनगरमध्ये अत्यंत खराब तर, भूमकर चौक, कोथरूड आणि निगडी या भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदली गेली.

तर एकूणच पुण्याची स्थिती पाहता सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण हे १३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि अतिसूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण हे ८६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके होते. एकाच दिवसात पुण्यातील विविध भागांमधील पीएम २.५ च्या प्रमाणातही दुप्पट तर काही ठिकाणी तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले.

म्हणून ढासळली गुणवत्ता

  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर

  • यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन

  • त्यात हिवाळ्यामध्ये हे धूलिकण हवेतच तरंगतात

  • हवेची गुणवत्ता ढासाळण्यामागे हवामानाची स्थितीदेखील महत्त्वाची भूमिका बजावते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: 'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर

अग्रलेख : नीतिमूल्यांचा ‘ताज’

Wild Animal : वन्यजीवांच्या संख्येत होतेय घट; गेल्या ५० वर्षांत सरासरी ७३ टक्क्यांनी कमी

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

SCROLL FOR NEXT