NCP Ajit Pawar  esakal
पुणे

Ajit Pawar : अजित पवारांचा बारामतीत शनिवारी होणार नागरी सत्कार !

मिलिंद संगई, बारामती.

Ajit Pawar : तब्बल 65 दिवसांच्या कालखंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत शनिवारी (ता.26) येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. याच दिवशी अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव येथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी मधील फुटी नंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली व एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले.

या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार हे प्रथमच बारामती येत आहेत. त्यांचा नागरी सत्कार होत असल्यामुळे या नागरी सत्काराला उत्तर देताना अजित पवार आपल्या मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

एरवी दर शनिवारी बारामतीत विविध विकास कामांच्या पाहणी निमित्त येणाऱ्या अजित पवारांनी गेले अडीच महिने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीला येणे कमी केले होते. त्यामुळे आता प्रदीर्घ कालावधीनंतर अजित पवार बारामतीत येतअसल्यामुळे त्यांच्य सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी केली आहे.

बारामती येथील कारभारी सर्कल पासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून नंतर शारदा प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरिक सत्कार केला जाणार असल्याची माहिती बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.

बारामतीकरापुढे अजित पवार आपल्या भाषणामध्ये काय भूमिका म्हणतात याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"हरियानातील दलितांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे... "; नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं

Pune Accident : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला डंपरने चिरडले, कोथरूडमध्ये भीषण अपघात

VBA Candidates: विधानसभेसाठी 'वंचित'कडून 10 उमेदवार जाहीर; सर्व उमेदवार मुस्लिम

Diabetes Patch: नवरात्रीत कतरिनाच्या हातावर असलेले 'डाबिटीज पॅच' नेमकं कसं कार्य करतं, वाचा सविस्तर

Latest Maharashtra News Updates : सत्यशील शेरकर शरद पवारांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT