Ajit Pawar Baramati Sabha: दोन महिन्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचे आगमन झाल्यानंतर उत्स्फूर्त स्वागत झाले.
शहराच्या वेशीवर छत्रपती शिवाजी उद्यानापासून अजित पवार यांची उघड्या जीपमधून राष्ट्रवादीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी जाहीर सभेत बारामतीकरांना संबोधित केले.
अजित पवार म्हणाले, मी बारामतीकरांमुळे इथंपर्यंत पोहचलो आहे. सुदैवाने तिजोरी माझ्या हातात आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांसाठी मी निधी आणेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. त्यामुळे विकासकामांसाठी मी त्यांना विनंती करेल. त्यांनी मंजूरी दिली तर मी निधी देतो. जिल्ह्यातील महत्वाचे कामे मला करायचे आहे. पुणे-नगर-नाशिक रेल्वेसाठी मी पाठपुरवठा करणार आहे. यासाठी मी दिल्लीत देखील जाणार आहे.
येणाऱ्या दिवसात चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी देवाला केली आहे. विकासकामे करताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. याचा त्रास लोकांना होतो. भावना दुखावतात, असे पवार म्हणाले.
मी मोदींच्या विरोधात सभा घेतल्या मी मान्य करतो. कारण नंतरच्या काळात कसं काम होणार हे मला माहित नव्हते. आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. बारामची फलटण मार्गोचे ७०० कोटी रुपयाचे काम मंजूर झालं आहे. काम नक्की पूर्ण होणार आहे. भिगवण-बारामती रस्त्याचे काम सुरु आहे, पालखी मार्गाचे काम सुरु आहे, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी अनेक विकासकांचे उदाहरण दिले. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.