Ajit Pawar 
पुणे

Ajit Pawar: सांगवी बोपोडी पुलाचे उपमुख्यमंत्री 'अजित पवार' यांच्या हस्ते उद्घाटन; सांगवीच्या वैभवात भर

Ajit Pawar: पिंपरी चिंचवड व पुणे शहराला जोडणारा मध्यवर्ती भागातील मुळा नदीवरिल सांगवी बोपोडी पुलाचे बुधवार ता.९ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी: पिंपरी चिंचवड व पुणे शहराला जोडणारा मध्यवर्ती भागातील मुळा नदीवरिल सांगवी बोपोडी पुलाचे बुधवार ता.९ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. आधी पुलाचे काम संथगतीने झाले.त्यात गेली काही महिन्यांपासून पुलाचे काम होवूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुलाचे उद्घाटन करून विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी उद्घाटन करून लोकार्पण करण्यात यावे अशी नागरिकांमधून मागणी होती.

पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा दुवा झाल्याने ईतर रस्त्यावरील ताण कमी होवून रहदारी सुकर होण्यासोबतच नागरिकांचा दोन्ही शहरांत ये जा करण्यासाठी वेळ व इंधन बचत होणार असल्याने नागरिकांमधून हा पुल लवकर खुला करण्याची नागरिकांची मागणी व उत्सुकता होती.

यावेळी आमदार अश्विनी जगताप, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह,जिल्हाधिकारी सुहास दिवसे,भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप,माजी महापौर उषा ढोरे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे,अतुल शितोळे , संतोष कांबळे, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे,आनंद छाजेड,अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार बोराटे, चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यासह सांगवीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगवीच्या वैभवात भर - पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार अशी जुनी सांगवीची ओळख आहे. सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूलानंतर मुळा नदी परिसरातील गर्द झाडी पलिकडे पुणे विद्यापीठाच्या वनराईने नटलेल्या या भागात पुल झाल्याने जुनी सांगवीच्या वैभवात भर पडली आहे.पुणे व पिंपरी चिंचवड शहर या पुलामुळे जोडले गेल्याने सांगवीचा मुळा नदी किनारा परिसर गजबजणार आहे.

ज्येष्ठांनी केले होते प्रतिकात्मक उद्घाटन - निसर्ग रम्य परिसर व पुलाचे काम होवूनही पुल खुला होण्यास होणारी दिरंगाई यामुळे येथील ज्येष्ठांनी काही दिवसांपूर्वीच या पुलाचे लवकर उद्घाटन करून लोकार्पण करावे अशी मागणी करत या पुलाचे प्रतिकात्मक उद्घाटन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

अखेर पुलाचे उद्घाटन झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुलाच्या उद्घाटनासाठी येणार असे कळताच सांगवी करांनी सकाळपासूनच पुल परिसरात मोठी गर्दी केली होती.

सकाळने केला पाठपुरावा - पुणे हद्दीतील भुसंपादन,सेवा पोहोच रस्ते,दप्तर दिरंगाई अशा विविध कारणांमुळे या पुलाचे काम मुदत ओलांडून संथ गतीने झाले.याबाबत सकाळ मधून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.

असा आहे पूल

  • पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त कामातून या पुलाचे काम करण्यात आले आहे.

  • एकुण चाळीस कोटी ऐंशी लाख रुपये अंदाजित रक्कम या पुलासाठी खर्च करण्यात आली आहे.

  • २०२२ मध्ये पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली.

  • कामाची मुदत दोन वर्षं इतकी होती.मात्र भुसंपादन व इतर कारणांमुळे पुन्हा मुदतवाढ देत २०२४ पर्यंत काही महिने प्रतिक्षा करावी लागली.

  • पुलाची एकुण लांबी-७६० मी.

  • रुंदी -१८ मी.पुलाची नदीवरील लांबी-१२५ मी.पुलाची पुणे हद्दीतील पोहोच रस्ता लांबी-५४० मी.पुलाची पिंपरी हद्दीतील पोहोच रस्ता -१५ मी.

मुळा नदी किनारा रस्ता मार्गे शितोळे नगर मुख्य रस्ता छत्रपती संभाजी महाराज पुल मार्गे पुणे औंधकडे जाता येणार आहे.पुण्याहून पिंपरी तज्ञ चिंचवड शहरात शितोळे नगर ममता नगर प्रियदर्शनी नगर मार्गे पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावरून दापोडी,पिंपळे गुरव आदी भागात ये जा करता येणार आहे.

या पुलामुळे सांगवीच्या वैभवात भर पडली आहे.याचबरोबर पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा मध्यवर्ती सेतू ठरणार आहे.शितोळे परिवाराने या पुलासाठी जागा दिलेली आहे. काम दर्जेदार व गुणवत्तापुर्ण व्हावे.याचबरोबर कामात सौंदर्यदृष्टी लाभावी यासाठी समस्त सांगवी करांच्या वतीने सरकार शितोळे सेतूसाठी पाठपुरावा करण्यात आला

--- प्रशांत शितोळे माजी नगरसेवक जुनी सांगवी.

पुल खुला झाल्याने रहदारीसोबतच व्यायाम प्रेमी मंडळी, ज्येष्ठ नागरिक यांना निसर्गाच्या सान्निध्यात फेरफटका मारता येणार असल्याने सांगवीच्या सौंदर्यात या वास्तु मळे भर पडली आहे.

--- रविन्द्र निंबाळकर अध्यक्ष अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT