Ajit Pawar kept promise One hundred bed govt hospital approved in Waghalwadi baramati sakal
पुणे

Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीकरांना दिलेला शब्द खरा केला; वाघळवाडीत शंभर खाटांचे सरकारी रुग्णालय मंजूर

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने सोमेश्वरनगर-वाघळवाडी येथे शंभर खाटांचे रूग्णालय मंजूर झाले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्थ ते राहणार आहे.

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : येथे गुरूवारी (ता. १४) झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघळवाडीत सरकारी रूग्णालय उभारणार असा शब्द दिला होता आणि शुक्रवारी (ता. १५) ते मंजूर झाले आणि तेही निधीसह!

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने सोमेश्वरनगर-वाघळवाडी येथे शंभर खाटांचे रूग्णालय मंजूर झाले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्थ ते राहणार आहे. त्याच्या बांधकामासाठीही ७७ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

गुरूवारी सोमेश्वरनगर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी शंभर बेडचे सरकारी रूग्णालय करण्याचा मानस आहे असे सांगितले. त्यादृष्टीने कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदींशी बुधवारी रात्रीच चर्चा झाली आहे असेही पवार यांनी सांगितले होते.

बुधवारी रात्रीच शासकीय महाविद्यालयाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदींनी पवार यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव तयार केला आणि तो त्वरित मंत्रालयात सादरही केला.

गुरूवारीच सरकारी रूग्णालयास मंजुरी मिळाली आज शासन निर्णयही प्राप्त झाला हे विशेष. उच्चस्तरीय सचिव समितीच्या बांधकामाबाबतच्या मान्यतेच्या अधिन राहून ७७.७९ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यताही प्रदान करण्यात आली. आता जागा उपलब्ध होताच पदनिर्मिती, यंत्रसामर्गी उपलब्धता होणार असून बांधकामाचे टेंडर निघणार आहे.

दरम्यान, याआधी पवार यांच्या प्रयत्नानेच वाघळवाडी ग्रामपंचायतीकरिता सोमेश्वर कारखान्याच्या जागेवर ४ कोटी ७७ लाखांचे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य विभागाव्दारे मंजूर झाले होते. आता ते रद्द केले जाणार असून थेट रूग्णालयच होणार आहे.

यापूर्वी तालुक्यात शासकीय रूग्णालयाचे आधीचेच पाचशे बेडचे रूग्णालय आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने शहरासाठी सिल्व्हर ज्युबिली, पूर्व बारामतीसाठी रूई, उत्तर बारामतीसाठी सुपे अशी प्रत्येकी शंभर बेडची तीन उपजिल्हा रूग्णालये सुरू आहेत. बारामतीचा पश्चिम भाग मात्र यापासून वंचित होता.

फायदा काय होणार?

सोमेश्वरनगरच्या या रूग्णालयाचा लाभ बारामतीच्या पश्चिम पट्ट्यासह पुरंदर तालुक्यातील जेजुरीपर्यंतच्या रूग्णांना होणार आहे. सोमेश्वर कारखाना परिसरातील गोरगरीबांसह ऊसतोड मजुरांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. पाच ते पन्नास रुपयांपर्यंतचाच खर्च रुग्णास येईल.

सुविधा काय असणार?

शंभर बेडेडे रूग्णालयात अस्थी, बालरोग, भूल, ह्रदय, मधुमेह, स्त्रीरोग अशा स्पेशालिस्ट डॉक्टरांसह साधारणतः ६४ स्टाफ अपेक्षित आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या तपासण्या (लॅब), एक्सरे-सोनोग्राफी अशी यंत्रसामग्री असणार आहे. मेडिकल कॉलेजशी संलग्न असल्याने शिकाऊ डॉक्टर सतत उपलब्ध होणार.

वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड म्हणाले, धडपड आरोग्य केंद्रासाठी करत होतो पण थेट शंभर बेडचे रूग्णालयच भेट मिळाले. अजितदादा, पुरूषोत्तम जगताप, संभाजी होळकर, डॉ. मनोज खोमणे यांचे आभार. अजितदादा हे गतीमान कार्यशैली असणारे नेतृत्व का मानले जाते हेच स्पष्ट होते.

सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप म्हणाले, कारखान्याने २०२१ च्या वार्षिक सभेत सहकारी तत्वावर रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. होता परंतु शेतकऱ्यांच्या पैशातून करण्याऐवजी सरकारी व्यवस्थेतून करू असा शब्द अजितदादांनी दिला होता. आमचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल अजितदादांचे आभार. जागेबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT