Ajit Pawar on Rural Health Services strengthened due to modern medical equipment pune  Sakal
पुणे

ग्रामीण आरोग्य सेवा आणखी बळकट - अजित पवार

पालकमंत्री अजित पवार यांचे मत ः वैद्यकीय उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणखी बळकट होईल. शिवाय ग्रामीण आरोग्य सेवेचे हे नवे पुणे मॉडेल ठरेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२७) येथे व्यक्त केले.जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनॅलिसिस) योजनेंतर्गत वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. या उपकरणांचे प्रदर्शन शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात भरविले होते. पवार यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता स्थानिक पातळीवरच अद्ययावत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. यामुळे गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. वैद्यकीय उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणांप्रमाणेच तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीदेखील आवश्यकता असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.’’

या आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी ९ खासगी कंपन्यांनी १७ कोटी ६० लाख रुपयाचा सामाजिक उत्तरदायित्व निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून १०२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण शक्य झाले आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून ४ कोटी २५ लाख रुपये देण्यात आले असून, या निधीतून ५४ आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून ४ कोटी ८९ लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातून ४८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनात विविध प्रकारचे २५२ आरोग्य सेवा वैद्यकीय उपकरणे व साहित्य मांडण्यात आले होते.

‘माझी जिल्हा परिषद-माझे अधिकार’

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेच्या कामांची माहिती करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्यावतीने खास ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपला ‘माझी जिल्हा परिषद- माझे अधिकार’ असे नाव दिले आहे. या ॲपचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT