पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचं आज (१२ ऑगस्ट) लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच कोल्डवॉर सुरू असल्याचा दावा कारणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना काही उद्योग उरला नाही अशा शब्दात अजित पवारांनी टीका केली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा होती. मुख्यमंत्री देखील एकदा चांदणी चौकातील वाहतुक कोंडीत अडकले होते. या चांदणी चौकाने कोणालाच सोडलं नाही. सगळ्यांना कमी अधी प्रमाणात या वाहतुक कोंडीने केला असल्याचे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री तब्येतीच्या कारणाने येऊ शकले नाहीत याची नोंद घ्यावी. कारण आलीकडे रुसून गेले, फुगून गेले असं सांगितलं जातं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांचं काम चांगलं सुरू आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस एका बाजूला होतेच. दुसरी बाजू मोकळी होती तिथं मी जाऊन उभा राहिलो.आता दोघंही त्यांच्या बरोबर आहेत. मग चुकलं काय? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.
सत्ताधारी पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, बातम्यांमध्ये अजित पवारांनी मिटींग घेतली असं चालवत होते. काल सह्याद्री अतिथीगृहात मी आणि फडणवीस दोघेही बैठका घेत होतो. पण मुख्यमंत्री हे पद वेगळं आहे. आम्ही बैठका घेतल्या तरी शेवटचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतात. तरी देखील 'कोल्डवॉर' चाललं... यांना उद्योग नाही, आता कुठं विरोधपक्षनेते झाले यांना कुठे कोल्ड आणि कुठे वॉर दिसलं कोणाला माहिती, अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, एकाला वाटतंय की या दोन मुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहेत का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा असून कसं चालेल आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे, हे काढायचं नव्हतं पण आम्ही बोललो नाही तर एकच बाजू दिसते, असेही अजित पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.