ajit pawar Sakal
पुणे

Pune News : ‘भिडेवाडा’ची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याचा अजित पवारांचा आदेश

फुलेवाडा हे स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करून गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

या वेळी मंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख उपस्थित होते.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृक्‌श्राव्य स्वरूपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली,

महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना पवार आणि भुजबळ यांनी दिल्या. स्मारकासाठी सभोवतालच्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी राज्य शासन आणि महापालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

फुलेवाडा स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा

फुलेवाडा हे स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली आहेत. या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी लगतचे जागामालक आणि भाडेकरू यांना मोबदला तसेच भूसंपादनासाठी आवश्यक रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. त्यास तत्काळ मान्यता देण्यात येईल, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?

Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

Ulhasnagar Assembly Election : आयलानी यांचा जीव भांड्यात! योगी आदित्यनाथ यांची मीरा भाईंदरच्या सभेतून कुमार आयलानी यांच्यासाठी हाक

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT