Ajit Pawar  Sakal
पुणे

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे फटका; अजित पवार यांचे केंद्राकडे बोट

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘कांदा प्रश्‍नावर उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढावा, असे केंद्राला कळविले होते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने लोकसभा निवडणुकीत राज्यातील चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसला,’’ अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. १४) दिली.

पवार यांनी आज विधानभवनात प्रशासकीय आढावा बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी कांदा प्रश्‍न पेटला. कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते.

मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो. तेव्हा केंद्रिय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांनादेखील याची कल्पना दिली.’’

प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार

अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्यामुळे त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये करण्यात आली आहे. त्यावर विचारले असता, ‘‘लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचे विश्‍लेषण करत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही,’’ असे सांगत अजित पवार यांनी अधिक बोलणे टाळले.

छगन भुजबळ नाराज नाहीत

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे, त्यावर पवार म्हणाले, ‘‘हे धादांत खोटे आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वत: भुजबळ यांनी नाराज नसल्याचे सांगितले आहे.

तरीदेखील माध्यमांतून अशाप्रकारच्या बातम्या पेरल्या जातात. आमचे फारच जवळचे, विरोधक आणि आमचा फार विचार करणाऱ्यांनी या बातम्या पिकवल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत फडणवीस हे नाशिक येथे काळे यांच्या अस्थी विसर्जनासाठी गेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारीच मी आमचा उमेदवार अंतिम करून अर्ज भरायला जाईल, तेथे राष्ट्रवादीचेच नेते असतील, अशी कल्पना दिली होती. निवडणूक बिनविरोध होणार होती, म्हणून भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना बोलाविण्यात आले नव्हते, म्हणून ते आले नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT