Parth Pawar Relaunch: काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील पवार कुटुंबात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. तेव्हापासून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
पार्थ यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावले होते, पण ते अयशस्वी ठरले होते. मावळ मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी अजित पवार यांनी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी पार्थ पवार यांनी वडिलांची पाठ सोडली नाही. अजित पवारांच्या पाठिमागे ते पूर्ण यात्रेत उभे होते. त्यामुळे अजित पवार लेकं 'पार्थ'ला राजकारणात रिलाँच केल्याची चर्चा आहे. व्यासपीठावर देखील फक्त अजित पवार आणि युवानेता पार्थ पवार, असा जयघोष होता. (latest marathi news)
पार्थ पवार हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलेल्या पत्रामुळे चर्चेत आले होते, ज्यात त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेला विरोध करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
पार्थ पवार यांची भूमिका नेहमी भाजप समर्थीत राहली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंड केला, याला पार्थ पवार पार्श्वभूमी आहे का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार यांना आपल्या मुलाला राजकारणात सक्रियपणे आणायचे आहे. मात्र शरद पवार यांनी पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पार्थ पवार यांना सक्रिय करायला कोणाचीही आडकाठी नाही. ज्या बारामतीतून पवार कुटुंबाचे राजकारण सुरु झाले तेथूनच पार्थ पवार राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. आता राजकारणातील वस्ताद शरद पवार यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.